राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना ठाकरे कुटुंबीय डेहराडूनला गेले. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी असा प्रश्नही नितेश राणे यांनी विचारला. तसंच जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही असंही नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर होते. पण फडणवीस तेव्हा पक्षासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी नाही असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच आदित्य ठाकरेंचे नाव न घेता नितेश राणे म्हणाले की, लवकरच बेबी पेंग्विनला सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.
advertisement
Location :
First Published :
November 03, 2023 9:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nitesh Rane : ठाकरे कुटुंब डेहराडूनला गेले, हीच का मराठा आरक्षणाची काळजी? नितेश राणेंचा सवाल