तब्बल 1 लाख 85 हजारांचा मोदक! बाप्पाचा मोदक खरेदी करण्यासाठी भक्तांमध्ये चढाओढ
2000 वर्षी म्हाडाच्या घरासाठी केलेल्या अर्जदारांसाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल. राखीव अर्जदारांना 156 घरं असून त्यांना 51 ते 52 लाख रूपयांमध्ये घरं देण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला होता. परंतु, हा निर्णय त्या अर्जदारांना मान्य नव्हता. तब्बल 25 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर घरं देताना इतकी भरमसाठ किंमत आकारली जात असल्याने अर्जदारांना ही किंमत अमान्य होती. त्यामुळे त्या सर्व अर्जदारांनी म्हाडाकडे किंमत कमी करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. म्हाडाच्या उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घराच्या किंमती कमी करण्याची मागणी अखेर मान्य केली आहे.
advertisement
ईद-ए-मिलादनिमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कसे असतील पर्यायी मार्ग?
म्हाडाच्या उपाध्यक्षांनी घराच्या किंमती कमी केल्यानंतर म्हाडाच्या घराच्या किंमती 51 ते 52 लाख रूपयांच्या ऐवजी 36 लाख रूपये किंमत आकारली जाणार आहे. उपाध्यक्षांच्या निर्णयामुळे सर्वच अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला. कोकण मंडळाने चितळसर मानपाडा येथील 185 भूखंडांच्या विक्रीची प्रक्रिया 2000 वर्षी सुरु केली. यासाठी 185 अर्जदारांनी म्हाडाकडे 10 हजार रुपये भरले होते. तर हे भूखंड या अर्जदारांना 62, 500 ते 1 लाख 87 हजार 500 रुपयामध्ये वितरीत करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे, ठाणे महानगर पालिकेने या भूखंडावर आरक्षण टाकल्याने प्रकल्प रखडला आणि भूखंड विक्रीही रखडली. त्यामुळे २५ वर्षे झाले तरी या अर्जदारांना भूखंड मिळाला नव्हता.
बाप्पााचं विसर्जन झालं! आता मटन मच्छीवर ताव, दुकानांवर ग्राहकांची गर्दी, विक्रेत्यांची चांदी
2006 मध्ये, सर्व समस्यांचे निराकरण करत कोकण मंडळाच्या त्याच भूखंडावर बहुमजली इमारत बांधायला सुरूवात केली. तेव्हापासून सुरू झालेलं इमारतीचं काम आता कुठे पूर्ण झालं आहे. फार मोठ्या प्रमाणावर असलेल्या घरांमध्ये त्या 156 अर्जदारांचे घरं राखीव ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित घरांना चालू सोडतीमध्ये विकले जात आहेत. म्हडाच्या या गृहयोजनेत 185 पैकी 29 अर्जदार उच्च गटातील असल्याने त्यांना योजनेतून बाद करण्यात आले. तर त्यापैकी 156 अर्जदारांना घरं देण्याचा निर्णय घेतला आहे.