Modak Auction: तब्बल 1 लाख 85 हजारांचा मोदक! बाप्पाचा मोदक खरेदी करण्यासाठी भक्तांमध्ये चढाओढ
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Modak Auction: गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांकडून काही परंपरा जपल्या जातात.
ठाणे: गणेश चतुर्थीपासून (27 ऑगस्ट) ते अनंत चतुर्दशीपर्यंत (6 सप्टेंबर) सर्वांनी लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केली. काल, दहा दिवसांनंतर गणरायाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अंबरनाथमध्ये एक अनोखी लिलाव प्रक्रिया पार पडली. अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा लिलाव करण्यात आला. विशेष म्हणजे या मोदकाला मोठी किंमत मिळाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांकडून काही परंपरा जपल्या जातात. यात अंबरनाथमधील खाटूश्याम मित्र मंडळाचा देखील समावेश आहे. हे मित्र मंडळ बुवापाडा परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतं. यंदा या मंडळाचं 33वं वर्ष होतं. हे मंडळ दरवर्षी मोदकाचा लिलाव करतं. या मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पा जवळ ठेवला जातो. या मोदकाचा अनंत चतुर्दशीला लिलाव केला जातो.
advertisement
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनामिका त्रिपाठी या गणेश भक्ताने हा मोदक लिलावात विकत घेतला. त्यांनी या मोदकासाठी तब्बल 1 लाख 85 हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावली. लिलावात विकत घेतलेला हा मोदक अनामिका आपले वडील प्रमोदकुमार चौबे यांना भेट देणार आहेत.
advertisement
खाटूश्याम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे म्हणाले, "हा मोदक विकत घेणाऱ्यांवर बाप्पाची वर्षभर कृपादृष्टी राहते. हा मोदक जो भाविक विकत घेतो, त्याची भरभराट होते, अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. यातून भाविक मोठ्या संख्येने मोदक खरेदीसाठी गर्दी करत असतात. त्यामुळेच अगदी पैसे नसले तरी लोक जुळवाजुळव करून या मोदकासाठी बोली लावतात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 07, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Modak Auction: तब्बल 1 लाख 85 हजारांचा मोदक! बाप्पाचा मोदक खरेदी करण्यासाठी भक्तांमध्ये चढाओढ