Manoj Jarange Patil : 'मराठा समाजाचे नव्हे तर ते...', मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल, वादाची नवी ठिणगी?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण अभ्यासकांवर हल्लाबोल करताना दुसरीकडे आता जरांगेंच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. मराठा समाजाचे समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांच्यावर कठोर टीका केली आहे.
जालना: मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होत असताना दुसरीकडे समाजाच्या अंतर्गत आरक्षणाच्या जीआर वरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण अभ्यासकांवर हल्लाबोल करताना दुसरीकडे आता जरांगेंच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. मराठा समाजाचे समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांच्यावर कठोर टीका केली आहे. “मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की तो एकट्याने ओढत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.
डॉ. संजय लाखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले की, जरांगे हे संपूर्ण मराठा समाजाचे नव्हे तर केवळ कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या एकाही मागण्या कायदेशीर किंवा घटनात्मक स्वरूपाच्या नसल्याचे त्यांनी म्हटले. “समाजाने कोट्यवधी रुपये आंदोलनावर खर्च केले, पण चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून समाजाचेच नुकसान झाल्याचा दावा लाखे यांनी केला.
advertisement
जरांगेंना आधीच ड्राफ्ट माहीत होता...
मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “आधीच ड्राफ्ट तयार करून नंतर अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचे नाटक करण्यात आले. गुलाल उधळून सरकारचा जयजयकार केला गेला, ही समाजाची फसवणूक आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
संघाच्या अजेंड्यानुसार काम...
आरएसएस अजेंड्याचा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटले की, जरांगेंचे आंदोलन थांबले तर त्यांना पाठिंबा मिळणार नाही. “RSS च्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं करण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. जरांगे यांच्या या मागण्या घटनात्मक व कायदेशीर कसोटीवर टिकाव धरण्यासारख्या नाहीत,” असा दावा त्यांनी केला. डॉ. लाखे पाटील यांच्या या टीकेमुळे मराठा आरक्षण चळवळीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 07, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : 'मराठा समाजाचे नव्हे तर ते...', मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल, वादाची नवी ठिणगी?