Thane Traffic : ईद-ए-मिलादनिमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कसे असतील पर्यायी मार्ग?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane Traffic: मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
ठाणे : 5 सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा 'ईद-ए-मिलाद' हा सण होता. या सणाच्यानिमित्त मुस्लिम समाजाकडून मिरवणूका काढल्या जातात. मात्र, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मुस्लिम समाजाने मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम संघटनांची विनंती लक्षात घेऊन शासनाने मुंबईसाठी ईद-ए-मिलादची सुट्टी 8 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकीसाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत. मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नये, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा सण आहे. या निमित्ताने भिवंडी शहरात भव्य मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे ठाणे पोलिसांनी सोमवारी (8 सप्टेंबर) दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे.
8 सप्टेंबर रोजी पर्यायी वाहतूक व्यवस्था कशी असेल
ठाणे आणि कल्याणमधून जुना आग्रा रोड मार्गे वाडा आणि चाविंद्रा मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंपाच्या पुढे प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं पेट्रोल पंपाजवळून उजवं वळण घेऊन नागाव मार्गे प्रवास करू शकतील.
advertisement
वाडा येथून भिवंडी शहराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहनं राष्ट्रीय महामार्ग 8 येथून किंवा मुंबई महानगर जलवाहिनीमार्गे प्रवास करतील.
वाडा येथून नदीनाका मार्गे भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा येथे प्रवेशबंदी असेल. हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवे वळण घेऊन खोणीगाव, तळवळी फाटा, कांबा रोड, वसई रोड मार्गे करावली किंवा विश्वभारती फाटा येथून गोरसईगाव मार्गे प्रवास करतील.
advertisement
वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांबोळी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहनं धामणकरनाका जलवाहिनी याठिकाणी उजवं वळण घेऊन जलवाहिनी मार्गे वाडा किंवा त्यापुढे प्रवास करू शकतील. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाविंद्रा जकात नाका येथे उतरवलं जाईल.
रांजनोली चौकातून भिवंडी शहरात जाणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या बसेस, केडीएमटी बसगाड्या, जड-अवजड वाहने, रिक्षा, मध्यम व हलक्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी असेल. जड-अवजड, मध्यम आणि हलकी वाहने रांजनोली नाका येथून वळसा घालून मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथून अंजुरफाटा किंवा वसई रोड किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकात नाका, जलवाहिनी मार्गे प्रवास करतील. एसटी, केडीएमटी, रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रांजनोली नाका येथे उतरवलं जाईल.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 07, 2025 2:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Traffic : ईद-ए-मिलादनिमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कसे असतील पर्यायी मार्ग?