ठाण्यामध्ये आई आणि मुलगा एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहेत. प्रमिला केणी यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेने तिकीट न दिल्यामुळे प्रमिला केणी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. धक्कादायक म्हणजे प्रमिला केणी यांच्या करता शरद पवार गटाच्या दिपा गावंड यांनी माघार घेतली आहे. शरद पवार गटाने अपक्ष प्रमिला केणी यांना पाठिंबा दिला आहे.
advertisement
प्रमिला केणी यांचा मुलगा मंदार केणी शिवसेनेतून तर आई अपक्ष शरद पवार गट पुरस्कृत निवडणूक लढवत आहेत. प्रमिला केणी प्रभाग क्रमांक 23 ब मधून आणि मुलगा मंदार केणी प्रभाग क्रमांक 23 ड मधून निवडणूक लढवत आहेत.
ठाण्यामध्ये कुणाची लढत?
ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना 131 पैकी 87 जागांवर तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना 53, मनसे 34 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 36 जागांवर लढत आहे. काँग्रेसने ठाण्यात 100 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, याशिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी 75 जागांवर लढत आहे.
