शिक्षण फक्त 10वी पास, पगार 40 हजार रुपये; वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी...
ठाणे महानगर पालिकेमध्ये, सध्या गट क आणि गट ड साठी मेगाभरती सुरू आहे. यामध्ये, सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्ससह इतर पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची तारीख 11 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबरपर्यंतची आहे. त्यामुळे अजूनही अर्ज न केलेल्या इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करा. शेवटच्या तारखेसाठी बरेच दिवस असले तरीही इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी, पदवीधर, इंजिनिअरिंग, पदवी, GNM, B.Sc, DMLT, M.Sc, B.Pharm अशी आहे. ही शैक्षणिक पात्रता सर्वच पदांना आधारलेली आहे.
advertisement
निर्माल्याचा बळीराजाला फायदा, दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेल्या हारांचं काय होतं?
ठाणे महानगर पालिकेमध्ये तब्बल 65 सेवा असून त्यामध्ये एकूण 1775 पदं रिक्त आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 असून तुम्ही मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा असून ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. अद्याप ठाणे महानगर पालिकेने अर्ज निघालेल्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठाणे महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अधिकाधिक माहिती उपलब्ध होईल. खुला प्रवर्गासाठी या परीक्षेचा अर्ज 1000 रूपये इतका आहे. तर, मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी परिक्षेची फी 900 रूपये इतकी आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायची आहे.
BEST-PMI ची भागिदारी, मुंबईकरांसाठी आरामदायी सवारी, नव्या बस पाहिल्या का?
महत्वाची बाब म्हणजे, जर माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक असतील तर त्यांना परीक्षा शुल्क माफ असेल. भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वांसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. तर, ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात पाहू शकता.