GMC Mumbai Bharti 2025 : शिक्षण फक्त 10 वी पास, पगार 40 हजार रुपये; वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी, आजच करा Apply
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
GMC Mumbai Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरीची संधी आहे. नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून तरूणांसाठी नोकरीची नवी संधी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 'गट- ड' साठी तब्बल 211 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरीची संधी आहे. नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून तरूणांसाठी नोकरीची नवी संधी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 'गट- ड' साठी तब्बल 211 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शासकीय महाविद्यालयात भरती केली जाणार आहे. पद कोणकोणते, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचं ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ? अर्ज करण्याची शेवटची पद्धत कोणती आहे ? या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घेऊया...
मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती केली जात आहे. या भरतीला सुरूवात 3 सप्टेंबरपासून झाली असून सध्या 'गट- ड' साठी तब्बल 211 पदांसाठी भरती केली जात आहे. मुंबईतल्या अनेक प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये भरती होत आहे. कक्षसेवक, सुरक्षा रक्षक, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल किंवा मजदुर, शिपाई, माळी, पोस्टमार्टम परिचर, आया, एक्स- रे (क्ष- किरण) सेवक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, सेवक, दवाखाना सेवक, रूग्णपट वाहक, अंधारगृह परिचर, संग्रहालय परिचर, प्राणी गृहपाल, न्हावी, भंडार कर्मचारी सह अनेक वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती केली जात आहे.
advertisement
3 सप्टेंबरपासून सुरूवात झालेल्या ह्या भरतीचा शेवट 26 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी रात्री ठीक 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जाणार असून परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप कळवण्यात आलेली नाही, नंतर कळवण्यात येणार असल्याची माहिती जाहिरातीत दिली आहे. (जाहिरातीची लिंक) 'गट- ड' साठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास आहे. वयोमर्यादा जास्तीत 38 इतकी असून कमीत कमी 18 इतकी आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रूपये इतकी फी असून राखीव प्रवर्गासाठी 900 रूपये इतकी फी आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 5:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
GMC Mumbai Bharti 2025 : शिक्षण फक्त 10 वी पास, पगार 40 हजार रुपये; वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी, आजच करा Apply