मंदिरातून चोरीला गेलं होते 1.8 लाख रुपये, महिनाभराने पुन्हा त्याच मंदिरात आले, कसा झाला चमत्कार?

Last Updated:

Thieves return stoolen money in temple : अचानक मंदिरात एका चादरीत बांधलेले नोटांचे गठ्ठे सापडले. यामुळे मंदिर प्रशासनच नाही, तर पोलीसही हैराण झाले. जेव्हा नोटा मोजल्या गेल्या तेव्हा सुमारे 1.8 लाख रुपये सापडले.

News18
News18
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बुक्करायसमुद्रम येथील मुसलम्मा मंदिर, जिथं सुमारे एक महिन्यापूर्वी चोरी झाली. मंदिराच्या हुंडीतून अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन चोर पळून गेले होते. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आणि मंदिरात पुन्हा नियमित कामकाज सुरू झाले. पण सुमारे एक महिन्यानंतर चोरीला गेलेले पैसे, सामान पुन्हा त्याच मंदिरात आलं.
गेल्या गुरुवारी अचानक मंदिरात एका चादरीत बांधलेले नोटांचे गठ्ठे सापडले. यामुळे मंदिर प्रशासनच नाही, तर पोलीसही हैराण झाले. जेव्हा नोटा मोजल्या गेल्या तेव्हा सुमारे 1.8 लाख रुपये सापडले. पैशांसोबत एक चिठ्ठीही होती. ज्यातून संपूर्ण प्रकरण उघड झालं.
पत्रात चोरांनी त्यांची चूक कबूल केली आणि काही धक्कादायक गोष्टीही सांगितल्या. चोरांनी सांगितलं की मंदिराची हुंडी लुटल्यानंतर त्यांच्या मुलांची तब्येत अचानक बिघडली.हा आजार ते दैवी शिक्षा मानत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चात्ताप झाला आणि त्यांनी मंदिरातील दानाचे पैसे परत केले. मंदिर बंद झाल्यानंतर चोरांनी आत जाऊन नोटांचे गठ्ठे एका चादरीत बांधून ठेवले. आता ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.
advertisement
चोरलेली मूर्ती हायवेच्या कडेला सोडली
याआधीही अशीच एक घटना घडली होती. लखनऊतील एका मंदिरातून चोराने 100 वर्षे जुनी अष्टधातूची राधा-कृष्ण मूर्ती चोरली. मूर्ती चोरल्यानंतर चोराच्या जीवनात अनेक वाईट गोष्टी घडू लागल्या. चोराने म्हटलं की, "मूर्ती चोरल्यानंतर मला सातत्याने भयानक स्वप्नं येऊ लागली आणि माझ्या मुलाची तब्येत खूपच बिघडली." या घटनांमुळे चोराला स्वतःच्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला. अखेरीस त्याने मूर्ती परत करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
या घटनेची एक विलक्षण बाजू म्हणजे चोराने मूर्ती हायवेच्या कडेला सोडली आणि तिच्यासोबत एक माफीनामाही म्हणजेच एक चिट्टी ही ठेवली. या माफीनाम्यात चोराने त्याच्या कृत्याबद्दल खूप पश्चात्ताप व्यक्त केला आणि या सर्व वाईट घटनांसाठी मूर्तीचोरीला जबाबदार ठरवलं.
आधी चोरी मग माफीनामा
तमिळनाडूतील मदुराईजवळील गावात एका चोरट्याने अगोदर चोरी केली; पण नंतर माफीनामा लिहून चोरीतील वस्तू परत केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ चित्रपट दिग्दर्शक एम. मणिकंदन यांच्या उसिलामपट्टी येथील घरात 8 फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती. या घटनेत चोरट्यांनी एक लाख रुपये, पाच सोन्याची नाणी आणि दोन राष्ट्रीय पुरस्कारांची पदके चोरून नेली होती.
advertisement
या प्रकरणी उसिलामपट्टी टाउन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या काही दिवसानंतर चोरट्यांनी चोरीचा काही मुद्देमाल परत घटनास्थळी आणून ठेवला. चोरट्यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) रात्री मणिकंदन यांच्या घरासमोर एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवली. त्यामध्ये दोन पदकं आणि तमिळमध्ये एक माफीनामा आढळला.
advertisement
चोराने आपल्या माफीनाम्यात लिहिलं की, 'सर, आम्हाला माफ करा. तुमच्या कष्टाचं फळ परत तुमच्या हवाली करतो.' माफीनाम्याच्या चिठ्ठीसोबत चोरट्यांनी चित्रपट क्षेत्रातील दोन राष्ट्रीय पुरस्कारांची पदकं परत केली आहेत.
मराठी बातम्या/Viral/
मंदिरातून चोरीला गेलं होते 1.8 लाख रुपये, महिनाभराने पुन्हा त्याच मंदिरात आले, कसा झाला चमत्कार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement