घो मला असला हवा! तरुणी शोधतेय नवरा; चांगलं स्थळ सुचवणार, त्याला 2 कोटी मिळणार

Last Updated:

Woman want husband : 33 वर्षीय तरुणीने स्वतःसाठी नवरा शोधण्यासाठी सोशल मीडियावर एक अशी ऑफर दिली आहे ज्यामुळे इंटरनेटवर वादळ निर्माण झालं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : आजकाल लोकांना चांगला जोडीदार शोधण्यात खूप अडचणी येतात. त्यामुळे लोकांचा शोध बराच काळ सुरू राहतो. अशीच एक तरुणी जिने जोडीदार शोधण्याचा एक विचित्र मार्ग शोधला आहे. ती चांगला जोडीदार सुचवणाऱ्या लोकांना 2 कोटी रुपये देण्यास तयार आहे. पण तिच्या 4 अटी आहेत ज्या लोकांना मान्य कराव्या लागतील.
अमेरिकेच्या बे एरियामध्ये राहणारी 33 वर्षीय ओन्लीफॅन्स स्टार एला हिने सोशल मीडियावर एक ऑफर दिली आहे. ज्यामुळे इंटरनेटवर वादळ निर्माण झालं आहे. तिने तिच्या सबस्टॅक पोस्टमध्ये लिहिलं आहे, "जर कोणी मला अशा व्यक्तीशी ओळख करून दिली ज्याच्याशी मी लग्न करू शकते, तर मी त्याला 1 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 83 लाख रुपये बक्षीस देईन आणि जर कोणी मला अशा व्यक्तीशी ओळख करून दिली जो मला त्याचे मूल होण्यासाठी 88 कोटी रुपये देईल, मला एकट्याने मुलाला वाढवू देईल, सिंगल मदर मानू देईल. तर ओळख करून देणाऱ्या व्यक्तीला 3 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 2.5 कोटी रुपये देईन"
advertisement
एला म्हणते की ती एक विचित्र व्यक्ती आहे आणि तिच्या आवडी-निवडी खूप वेगळ्या आहेत. तिनं लिहिलं, "डेट करण्यास किंवा लग्न करण्यास इच्छुक असलेला पुरूष शोधणं कठीण नाही, पण ज्यांच्याशी मी प्रत्यक्षात लग्न करू इच्छिते त्यांची संख्या खूप कमी आहे."
advertisement
तिने तिच्या मिस्टर राईटच्या अटी देखील सांगितल्या, ज्या सामान्य लग्नाच्या शोधापेक्षा खूप वेगळ्या आहेत. मुलगा निवडण्यासाठी तिच्याकडे 4 अटी आहेत. तिने सांगितलं की पुरूष बहुप्रेमळ असावा म्हणजे एकापेक्षा जास्त नातेसंबंध स्वीकारणारा. तिला तिचा जोडीदार असा असावा जो प्रत्येक लिंगाचा सहवास आवडतो. एला त्याला तिच्या आर्थिकदृष्ट्या समान मानते जेणेकरून तिला आधार देण्याची गरज भासू नये आणि तिला मुलं हवी आहेत आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारणारी व्यक्ती असावी.
advertisement
तिने स्पष्ट लिहिले, “सोप्या भाषेत सांगायचं तर मला असा पुरूष हवा आहे जो दुर्मिळ, श्रीमंत, रोमांचक आणि वचनबद्ध होण्यास तयार असेल.”
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार एलाने म्हटलं आहे की जर कोणी तिला अशा पुरूषाची शिफारस केली ज्याला ती ओळखत नाही आणि शेवटी त्याच्याशी लग्न केलं तर त्या व्यक्तीला 100,000 डॉलर्सचं बक्षीस मिळेल परंतु अट अशी आहे की शिफारस करणाऱ्याने प्रथम तिचा डेट-मी सर्वेक्षण फॉर्म भरावा आणि प्रामाणिक राहावं. जर ती खोट बोलली किंवा नियम मोडले तर संबंध लगेच संपलले जातील. एला स्वतःला प्रणय भांडवलशाहीची प्रणेती मानते. ती म्हणते की प्रेमाचा शोध फक्त डेटिंग अ‍ॅप्स किंवा मॅचमेकिंग एजन्सींपुरता मर्यादित का असावा? तिने क्राउडसोर्सिंगद्वारे प्रेम शोधण्याचा हा एक नवीन मार्ग म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
घो मला असला हवा! तरुणी शोधतेय नवरा; चांगलं स्थळ सुचवणार, त्याला 2 कोटी मिळणार
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement