जोडीदाराला घटस्फोट, बहीण-भाऊ झाले नवरा-बायको, मूलही झालं, पण नंतर घडलं ते धक्कादायक

Last Updated:

Brother Sister become Husband wife : दोघंही लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम करत होते. एकमेकांचा हात धरून चालायचे, गुपचूप किसिंग करायचे. 

News18
News18
नवी दिल्ली : आपल्या देशात भावाबहिणीचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. जर आपण मुलीला बहीण किंवा मुलाला भाऊ मानतो, तर आपण ते नातं आयुष्यभर जपतो. पण कधीकधी या नात्यांसाठी लाजिरवाणं प्रसंगही येतात, ज्या ऐकून आपल्या पायाखालची जमीन सरकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये भाऊबहीण एकमेकांच्या प्रेमात पडले. आपापल्या जोडीदाराला घटस्फोट देऊन त्यांनी लग्नही केलं. पण त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.
अँजेला पेआंग असं या महिलेचं नाव आहे. अँजेलाना तिचा चुलत भाऊ मायकल लीशी लग्न केलं आहे. दोघंही लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम करत होते. एकमेकांचा हात धरून चालायचे, गुपचूप किसिंग करायचे.  ते 7 वर्षांचे असताना मायकलच्या भावाने त्यांना कपाटात चुंबन घेताना पाहिलं. या घटनेनंतर त्यांना आपण काहीतरी चूक केली आहेस असं वाटलं. पण मायकेलने त्या दिवशी अँजेलाच्या आईला तो मोठा झाल्यावर तिच्याशी लग्न करेल, असं सांगितलं. त्यानंतर अँजेलाच्या आईने त्यांना फक्त चांगले मित्र राहण्याचा सल्ला दिला.
advertisement
जेव्हा ते दहा वर्षांचे झाले तेव्हा कुटुंबाने जाणूनबुजून त्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली कारण त्यांना त्यांच्या नातं पटत नव्हतं.  12 भावंडांपैकी सर्वात मोठी अँजेला एका मोठ्या मॉर्मन कुटुंबातील होती. तिची आई देखील मायकेलच्या आसपास असल्याबद्दल तिला फटकारत होती. वडिलांच्या नोकरीमुळे तिला अनेकदा परदेशात जावं लागत असे, ज्यामुळे ते अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहिले.
advertisement
काही वर्षांनंतर जेव्हा ते 17 वर्षांचे झाले तेव्हा ते त्यांच्या आजीच्या घरी भेटले, जिथं त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पण अँजेलाला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा ती आणि मायकेल पाईप क्लीनरपासून अंगठ्या बनवून एकमेकांना घालत असत. काही वर्षांनी अँजेला आणि मायकेल दोघांनीही दुसऱ्याशी लग्न केलं. अँजेलाला तीन मुलंही झाली.
पण दोघांचंही लग्न तुटलं आणि त्यांचा घटस्फोट झाला. 2018 मध्ये ते पुन्हा फेसबुकवर भेटले. दोघांनीही ऑनलाइन चॅटिंग सुरू केलं आणि त्यांना कळलं की दोघंही घटस्फोटित आहेत आणि युटामध्ये राहतात. लवकरच दोघंही पुन्हा भेटले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण युटामध्ये चुलत भावंडांमधील लग्न बेकायदेशीर आहे, असं लग्न केल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, हे त्यांना माहिती पडलं. त्यामुळे ते शेजारच्या कोलोरॅडो राज्यात गेलं आणि तिथं लग्न केले, इथं या नात्यासाठी कोणतीही कायदेशीर शिक्षा नव्हती. मायकल आणि अँजेला यांनी युटामध्ये चुलत भावाच्या लग्नाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी याचिकाही दाखल केली.
advertisement
संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या लग्नाची माहिती देण्यासाठी त्यांनी फॅमिली फेसबुक ग्रुपवर किस घेतानाचा एक फोटो पोस्ट केला जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाला या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा अँजेलाचे पालक आश्चर्यचकित झाले आणि त्यांची मुलं पूर्णपणे धक्क्यात होती. मुलांच्या नाराजीला न जुमानता अँजेलाने मायकेलसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना ग्रुपमधून बाहेर काढण्यात आलं.
advertisement
2020 मध्ये अनुवांशिक चाचणी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा एरिकचा जन्म झाला. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. मुलाच्या जन्मानंतर फक्त 14 महिन्यांनी 2021 मध्ये मायकलचा मृत्यू झाला. त्याला अनेक वर्षांपासून ड्रग्जचं व्यसन होतं, हेच त्याच्या दुःखद अंताचं कारण बनलं. मायकलच्या मृत्यूनंतर, अँजेला म्हणाली की ती तिची लव्हस्टोरी शेअर करून तिच्या दुःखाचा सामना करत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जोडीदाराला घटस्फोट, बहीण-भाऊ झाले नवरा-बायको, मूलही झालं, पण नंतर घडलं ते धक्कादायक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement