मुलीला बर्थडेला सोडून गेली आई, पार्टी संपायच्या अर्धा तास आधीच परतली, दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली

Last Updated:

Mother Daughter Story : तिला वाटलं होतं की मुलगी तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप मजा करेल, पण जेव्हा ती वेळेपूर्वी तिच्या मुलीला घेण्यासाठी पोहोचली तेव्हा तिथल्या दृश्याने तिला धक्का बसला.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
वॉशिंग्टन : शाळेत असताना कोणत्या मित्रमैत्रिणीची बर्थडे पार्टी असली की पालक आपल्या मुलांना त्या बर्थडे पार्टीत नेऊन सोडतात. अशावेळी पालक त्यांच्यासोबत राहतातच असं नाही. ते त्यांना बर्थडे पार्टीत सोडतात आणि पार्टी संपायच्या वेळेला पुन्हा आणायला जातात. तुम्हीही असंच करत असाल. एका महिलेनेही तेच केलं. तिने तिच्या मुलीला एका बर्थडे पार्टीत सोडलं. पार्टी संपायच्या आधीच ती परतली पण जे दृश्य दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
भारत असो किंवा परदेशात, पालक आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सोडतात ही एक सामान्य पद्धत आहे. अशा परिस्थितीत, पार्टी आयोजित करणाऱ्या लोकांची जबाबदारी असते की ते मुलांची काळजी घेतील आणि त्यांचे पालक येऊन त्यांना घेऊन जाईपर्यंत त्यांची काळजी घेतील. पण एका महिलेने तिच्या मुलीला पार्टीत सोडले तेव्हा तिला आश्चर्य वाटले, पण जेव्हा ती तिला घ्यायला आली तेव्हा तिला हे दृश्य पाहून खूप धक्का बसला.
advertisement
अमेरिकेतील ही घटना आहे. लॉरेन असं या महिलेचं नाव आहे. लॉरेनने टिकटॉकवर या धक्कादायक प्रसंगाची माहिती दिली. लॉरेनने तिच्या मुलीला मुलीला वाढदिवसाच्या पार्टीत सोडलं, तिला वाटलं की मुलगी तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप मजा करेल, पण जेव्हा ती वेळेआधी तिच्या मुलीला घेण्यासाठी पोहोचली तेव्हा तिथल्या दृश्याने तिला धक्का बसला.
advertisement
तिने सांगितलं की, जेव्हा ती तिच्या मुलीला पार्टीत सोडण्यासाठी गेली तेव्हा तिने पार्टी आयोजित करणाऱ्या आईला विचारलं की ती तिच्या मुलीला तिथे सोडून थोडा वेळ बाहेर जाऊ शकते का. त्या आईने तिला आश्वासन दिलं, अगदी, तुम्ही काळजी न करता तुमच्या मुलीला इथे सोडू शकता. लॉरेनने पार्टीची शेवटची वेळ देखील विचारली, जी संध्याकाळी 5 वाजता सांगण्यात आली होती. पण पार्टी संपायच्या अर्धा तास आधीच लॉरेन तिथं पोहोचली. जेव्हा ती तिच्या मुलीला साडेचार वाजता घेण्यासाठी पोहोचली तेव्हा दृश्य पूर्णपणे वेगळं होतं.
advertisement
ती म्हणाली, "तिथं कोणीही नव्हतं. माझी मुलगी एकटीच उभी होती. पार्टी रूम बंद होती, लाईट बंद होते आणि पार्टी आयोजित करणारी आई गायब झाली होती."   लॉरेनने तिच्या मुलीला विचारलं तेव्हा ती म्हणाली, "सर्वजण निघून गेले होते"
यानंतर लॉरेनने पार्टी होस्ट आईला फोन केला आणि मेसेज केला पण तिने प्रतिसाद दिला नाही. लॉरेन म्हणाली- "मी तिला 8 वेळा फोन केला, मेसेज पाठवले पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग मी मॅनेजरला विचारलं आणि त्याने मला सांगितलं की ते एक तासापूर्वी निघून गेले आहेत." याचा अर्थ पार्टी संपण्याची निश्चित वेळ संध्याकाळी 5 वाजता होती, परंतु पार्टी होस्ट आई दीड तास आधी सर्वांसह निघून गेली.
advertisement
हे प्रकरण इथंच संपलं नाही. लॉरेनने तिच्या मुलीला विचारलं की तिने काही खाल्लं आहे की नाही. यावर मुलीने उत्तर दिलं, नाही. तिथं अन्न वाटलं गेलं नाही, केक कापला गेला नाही आणि गिफ्टही उघडल्या गेल्या नाहीत." हे ऐकून लॉरेन आणखीनच धक्का बसली. ती म्हणाली, "आता मला वाटतं की मी त्या आईवर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे."
advertisement
लॉरेनच्या या अनुभवाने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. अनेकांनी तिचं समर्थन केलं. एका युझरने लिहिलं, "वाढदिवसाच्या पार्टीत मुलांना सोडणं अगदी सामान्य आहे, पण सर्व मुलांना नेण्याआधी पार्टी संपवणं आणि ते ठिकाण सोडणं अत्यंत बेजबाबदार आहे."  काही लोकांनी असंही म्हटलं की कथेची दुसरी बाजू असू शकते. एकाने लिहिलं, "आशा आहे की अल्गोरिदम मला त्या दुसऱ्या आईची कहाणी देखील दाखवेल जेणेकरून संपूर्ण चित्र उघड होईल."
मराठी बातम्या/Viral/
मुलीला बर्थडेला सोडून गेली आई, पार्टी संपायच्या अर्धा तास आधीच परतली, दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement