मायलेक खेळायचे लॉटरी, आईचा मृत्यू, त्यानंतरही मुलाने खेळणं सोडलं नाही, शेवटी घडलं असं की...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Lottery News : जेव्हा टेरीची आई पॅट्रिशियाला कर्करोग झाल्याचं समजलं. तेव्हा आई आणि मुलाने मिळून हेल्थ लॉटरी खेळण्याचा निर्णय घेतला. मार्च 2020 मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं.
लंडन : आपल्यापैकी बहुतेक जण आपले नशीब बदलण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. अनेक लोकांचे नशीब बदलते. परंतु फार कमी लोकांचे नशीब अशा प्रकारे बदलते की ते गरीबातून श्रीमंत होतात! असाच एक चमत्कार ब्रिटनमधील एका माणसासोबत घडला जेव्हा लाखोंच्या कर्जात बुडाल्यानंतर त्याने त्याच्या मृत आईला प्रार्थना केली आणि त्याला लॉटरी मिळाली.
लॉटरीची ही आश्चर्यकारक कहाणी यूकेमधील हर्टफोर्डशायरमधील हिचिन येथील टेरी आणि डॅनी बिलिंग्ज या दोन भावांची आहे. टेरी आणि डॅनी त्यांच्या आई पॅट्रिशियासोबत लॉटरी खेळत असत. जेव्हा टेरीची आई पॅट्रिशियाला कर्करोग झाल्याचं समजलं. तेव्हा आई आणि मुलाने मिळून हेल्थ लॉटरी खेळण्याचा निर्णय घेतला. मार्च 2020 मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं.
मरताना आईने टेरीकडून वचन घेतलं की तो दर आठवड्याला तिने ठरवलेल्या आकड्यांसह लॉटरी खेळत राहिल. ही संख्या फार असामान्य किंवा अद्वितीय नव्हती. त्यात आईचं जन्म वर्ष 46, तिचा आवडता क्रमांक 6, तिच्या मुलाचा वाढदिवस, तिच्या आईचा वाढदिवस 22, तिचा स्वतःचा वाढदिवस 16 आणि तिच्या मुलीचा वाढदिवस 29 यांचा समावेश होता.
advertisement
पॅट्रिशियाच्या मृत्यूनंतर टेरीने लॉटरी खेळणं सुरूच ठेवलं आणि त्याचं कर्ज वाढत गेलं, पण त्याने हार मानली नाही. टेरी म्हणते की असं काहीतरी घडू शकतं यावर तुम्हाला कधीच विश्वास बसणार नाही. लॉटरी जिंकण्याच्या एक आठवडा आधी मी आकाशाकडे पाहिलं आणि माझ्या आईला सांगितलं की मला तिची किती आठवण येते आणि माझ्या 16 लाख रुपयांच्या कर्जाचा आणि संघर्षाचाही उल्लेख केला.
advertisement
त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी टेरीला एक ईमेल आला ज्यामध्ये त्याने 1 लाख पाऊंड म्हणजेच 1 कोटी 19 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचं उघड झालं.
विचित्र गोष्ट अशी होती की या लॉटरीमधील आकडे त्याने आधीच विचार करून निवडले होते. म्हणजेच, त्यातील पाचही आकडे तेच होते ज्यावर टेरी खेळत होता. टेरीने अधिकाऱ्यांना फोन केला आणि काही चौकशीनंतर लॉटरी कंपनीने पुष्टी केली की त्याने तीच रक्कम जिंकली आहे. टेरीने त्याचं सर्व कर्ज फेडलं आहे आणि त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे गुंतवले आहेत.
Location :
Delhi
First Published :
September 03, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/Viral/
मायलेक खेळायचे लॉटरी, आईचा मृत्यू, त्यानंतरही मुलाने खेळणं सोडलं नाही, शेवटी घडलं असं की...