एक वर्षाने लहान नवरा, बायकोला स्पर्श केला नाही, 6 महिने संबंधच ठेवले नाही, नात्याचा शेवट मृत्यू

Last Updated:

Couple Story : संजू आणि संगीता गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर भेटले होते. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोघं जवळ आले, त्यांनी लग्नही केलं. यानंतर जे घडले ते धक्कादायक होतं.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
रांची : 21 वर्षांचा संजू निषाद आणि 22 वर्षांची संगीता गेल्या वर्षी सोशल मीडियावर यांची भेट झाली. दोघंही इन्स्टाग्रामवर भेटले होते. त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न केलं. दोघांचंही लव्ह मॅरेज पण तरी त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवले नाही असा दावा करण्यात आला. त्यानंतर बायकोचा मृत्यू झाला आहे.
छत्तीसगडच्या बालोदाबाजारमधील ही घटना आहे. संजू आणि संगीता यांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये इतकी जवळीक वाढली की संगीता लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली. दोघांनीही परस्पर संमतीने औषध घेऊन गर्भपात केला. 2024 च्या अखेरीस त्यांनी लग्न केलं.
लग्नानंतर सगळं ठिक होईल असं संगीताला वाटलं. पण तसं काहीही घडलं नाही. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, पण लवकरच दोघांमध्ये तणाव वाढू लागला. संगीता पुन्हा प्रेग्नंट झाली पण यावेळी संजूने मुलाला आपलं म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.
advertisement
संजूने लग्नानंतर संगीतासोबत कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा दावा केला. 6 महिन्यांपासून आपण तिला स्पर्शही केला नाही मग ती प्रेग्नंट कशी झाली. असा संशय त्याला आला. संगीताचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्याने केला. या संशयामुळे त्यांच्या नात्यात ताण आला. दोघांमध्ये भांडणं होऊ लागली, छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले.
advertisement
18 ऑगस्ट रोजी दोघांमधील भांडण इतकं विकोपाला गेलं की रागाच्या भरात संजूने संगीताचा गळा चाकूने चिरला. हत्येनंतर घाबरून त्याने मृतदेह पोत्यात भरला आणि जवळच्या नदीत फेकून दिला. त्यानंतर तो असं वागू लागला की जणू काही घडलंच नाही.
दोन दिवसांनी संगीताच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 26 ऑगस्ट रोजी संगीताचा मृतदेह नदीकाठी आढळला. चाकूच्या खुणा पाहून पोलिसांना संजूवर संशय आला. चौकशीदरम्यान संजूने आपला गुन्हा कबूल केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
advertisement
लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये शारीरिक आकर्षण कमी का होतं?
ज्या व्यक्तीसाठी तुम्ही जगाशी लढून त्याला आपलं बनवता, त्याच व्यक्तीसोबत लग्नाच्या काही वर्षांनी तुमचं प्रत्येक वाक्य भांडणाचं कारण बनतं. लग्न झाल्यावर हळूहळू रोमान्स आणि उत्साह दोन्ही कमी होऊ लागतात. याची अनेक कारणं असू शकतात. पण नात्यात काही अशा चुका असतात, ज्यामुळे लग्नानंतर प्रेम कमी होतं. अनेकदा समाजामुळे ही लग्नं वर्षानुवर्षं टिकतात, पण जोडप्यांमधील शारीरिक जवळीक आणि आकर्षण संपून जातं. याबद्दल मेसेज कोच आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. सपना शर्मा यांनी यामागील कारणं सांगितली आहेत.
advertisement
खाजगी आयुष्याचा अभाव : भारतात अनेक कुटुंबं एकत्र राहतात. अशा परिस्थितीत घरातील वडीलधाऱ्यांना वाटतं की जोडप्यांना जास्त खाजगी वेळ मिळू नये. इतरांसमोर एकमेकांना स्पर्श करणं किंवा दिवसा खोलीचा दरवाजा बंद करणं असभ्य मानलं जातं. खोलीचा दरवाजा फक्त रात्री सगळे झोपल्यावरच बंद करता येतो. यामुळे पती-पत्नीला थोडीही खाजगी वेळ मिळणं खूप कठीण होतं. अशा परिस्थितीत जोडपी एकत्र राहतात, पण एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत.
advertisement
लग्नानंतर रोमँटिक डेटिंग नाही : मोठ्या शहरांमध्ये किंवा विभक्त कुटुंबात राहणारे लोक अजूनही ही संकल्पना समजून घेतात. पण एकत्र कुटुंबात पती-पत्नीला एकत्र बाहेर जाणं खूप अवघड असतं. लग्नानंतर बाहेर जाण्याची पद्धत अशी असते की, संपूर्ण कुटुंब, मित्र किंवा मुलं सोबत असतात आणि ते फक्त गर्दीच्या ठिकाणी जातात. वेगळ्या रोमँटिक डेटवर जाण्याचा विचारही मनात येत नाही. सुट्ट्यांमध्ये किंवा प्रवासातही बहुतेक वेळा मित्र किंवा कुटुंब सोबत असतात.
advertisement
घरी वाईट कपडे घालणं : तुम्हाला डेटिंगचे दिवस आठवतात का? तुम्ही तुमच्या प्रियकराला भेटायला सर्वात सुंदर कपड्यांमध्ये जाता. सुंदर कपडे, हेअरस्टाईल, दागिने आणि परफ्यूम हे सर्व प्रभावित करण्यासाठी वापरले जातात. पण लग्नानंतर हे सर्व इतरांना दाखवण्यासाठीच केलं जातं. तर पती-पत्नी एकमेकांसमोर तेच जुने आणि फाटलेले कपडे घालतात, जे आता फेकून देण्याच्या लायकीचे असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आकर्षणाची अपेक्षा कशी करू शकता?
शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष : तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा एखाद्याचं लग्न होतं, मग तो मुलगा असो वा मुलगी, या खास दिवशी फिट दिसण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. पण लग्नानंतर आपण पुन्हा बसून काम करतो, जास्त खातो-पितो आणि झोपतो. 30 वर्षांनंतर अनेकांचं वजन वाढतं किंवा त्यांच्या शरीराची लवचिकता आणि रचना बिघडते.
इथे वजन किंवा आकाराबद्दल बोललं जात नाही, तर शरीर तंदुरुस्त आणि उत्साही ठेवण्याबद्दल बोललं जात आहे. लोक विसरतात की शारीरिक आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी काही विशेष गुणांची आवश्यकता असते. लग्नापूर्वी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी हे गुण आवश्यक होते, तर लग्नानंतर तुमचं ढिसूळ शरीर अचानक आकर्षक कसं दिसेल?
उत्सुकतेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अभाव : शारीरिक जवळीक आणि शारीरिक आकर्षणासाठी थोडं रस आवश्यक आहे. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी नवीनता नेहमीच महत्त्वाची असते, मग ती बाहेर असो वा आत. पण अनेक कुटुंबांमध्ये, जर एखाद्याला आपली वेगळी ओळख टिकवायची असेल, तर ते वाईट मानलं जातं. ते आपल्या जोडीदाराला खूश करण्यावर किंवा नियंत्रित करण्यावर इतकं लक्ष केंद्रित करतात की, हळूहळू दोघेही एकमेकांसारखे बनतात. तुमची वेगळी ओळख संपताच, आकर्षणाची जादूही नाहीशी होते.
मराठी बातम्या/Viral/
एक वर्षाने लहान नवरा, बायकोला स्पर्श केला नाही, 6 महिने संबंधच ठेवले नाही, नात्याचा शेवट मृत्यू
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement