हॉटेलमध्ये रात्र घालवायला गेलं कपल, 2-4 तासांतच बाबूची अशी अवस्था, पळाली जानू

Last Updated:

Boyfriend Girlfriend News : ते एका पार्टीत भेटले. तेव्हापासून त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. ते एकमेकांना भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी रात्र एकत्र घालवली. त्यानंतर असं घडलं की...

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
बीजिंग : लग्न झालं तरी काही लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. असेच संबंध असणारे एक कपल, जे हॉटेलमध्ये गेले. त्यांनी एकत्र रात्र घालवली. पण काही तासांतच बॉयफ्रेंडची अशी अवस्था झाली की गर्लफ्रेंड घाबरली. बॉयफ्रेंडची अवस्था पाहून गर्लफ्रेंडने हॉटेलमधून पळ काढला. चीनमधील ही घटना चर्चेत आली आहे.
एक 66 वर्षाचा पुरुष, ज्याचं लग्न झालं होतं आणि एका महिलेशी प्रेमसंबंधही होते. ते दोघं 1980 च्या दशकात एका कारखान्यात एकत्र काम करायचे. 2013 मध्ये ते पुन्हा एका पार्टीत भेटले. तेव्हापासून त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. 24 जुलै रोजी ते एकमेकांना भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी रात्र एकत्र घालवली. दोघंही झोपले. महिलेला जाग आली तेव्हा पुरुष निर्जीव अवस्थेत पडला होता.
advertisement
महिला घाबरून तिथून पळून गेली. ती परत आली आणि हॉटेलची रूम उघडत होती पण ती उघडू शकली नाही.
तेव्हा तिने हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याकडे मदत मागितली. तिने आत जाऊन त्या पुरूषाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीच हालचाल झाली नाही. म्हणून रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावण्यात आलं, ज्यांनी त्या पुरूषाच्या मृत्यूची पुष्टी केली.
advertisement
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, जेव्हा त्या पुरूषाच्या कुटुंबाला हे कळलं तेव्हा त्यांनी न्यायालयीन खटला दाखल केला. त्या पुरूषाच्या प्रेयसीकडून 77 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच एकूण 67 लाख रुपयांची भरपाई मागितली. पण न्यायालयाने अंतिम निकाल देताना केवळ 8600 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 7.5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
advertisement
न्यायालयाने सांगितलं की त्या पुरूषाचा मृत्यू त्याच्या आजारांमुळे झाला आणि तो स्वतःच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. पणप्रेयसी बाहेर जाऊन एक तासानंतर परत येऊन त्याला वाचवू शकली असती. तिच्या अनैतिक वर्तनामुळे तिच्यावर ही भरपाईची रक्कम देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/Viral/
हॉटेलमध्ये रात्र घालवायला गेलं कपल, 2-4 तासांतच बाबूची अशी अवस्था, पळाली जानू
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement