दोनदा हनीमून, पण नवरा खूश करू शकला नाही, बायकोची कोर्टात धाव, काय लागला निकाल?

Last Updated:

Husband Wife News : महिलेने तिचा पती वैवाहिक जीवनासाठी अयोग्य आणि मुलं जन्माला घालण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं. हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत हे क्रूरतेचं आहे असा दावा करत तिने हायकोर्टात याचिका केली आहे.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
हैदराबाद : कित्येक पुरुष आणि महिला अशा आहेत, ज्यांनी लग्नाबाबत बरीच स्वप्न रंगवलेली असतात. लग्न ठरलं की स्वप्न प्रत्यक्षात साकार कशी होतात याची प्रतीक्षा असतात. पण लग्नानंतर अशी परिस्थिती येते की सगळीच स्वप्न साकार होतात असं नाही. लग्नाबाबत अशीच काही स्वप्न रंगवलेली एक महिला, जिने एकदा नव्हे तर दोनदा हनीमून केला. पण तिचा नवरा तिला खूश करू शकला नाही, असा आरोप करत तिने कोर्टात धाव घेतली आहे.
advertisement
तेलंगणातील हे प्रकरण आहे. डिसेंबर 2013 मध्ये या कपलचं लग्न झालं. महिलेने सांगितल्यानुसार तिने दोनदा हनीमून केला. एकदा 2013 साली केरळमध्ये आणि दुसरा 2014 साली काश्मीरमध्ये. पण तिचा नवरा शारीरिक संबंध ठेवू शकला नाही, तो तिला खूश करू शकला नाही. त्यामुळे त्यांचं लग्न कधीच पूर्ण झालं नाही. 
advertisement
तिने असाही युक्तिवाद केला की तिच्या पतीने त्याला रूमेटॉइड आर्थरायटिस आहे हे लपवलं होतं. ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होतं. हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत हे क्रूरतेचं आहे असा दावा केला. तिने 2017 मध्ये झालेल्या मेडिकल टेस्टचाही उल्लेख केला ज्यामध्ये तिचा पती वैवाहिक जीवनासाठी अयोग्य आणि मुलं जन्माला घालण्यास असमर्थ असल्याचं आढळलं.
advertisement
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार तिने तेलंगणा उच्च न्यायालयात पती नपुंसक असल्याचं कारण देत घटस्फोट आणि 90 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे.
महिलेच्या पतीने तिचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि लग्न कधीच पूर्ण झालं नाही या पत्नीच्या दाव्याचं खंडन केलं. त्याने तात्पुरत्या इरेक्टाइल डिसफंक्शनची कबुली दिली असली तरी उपचार केले असल्याचं त्याने सांगितलं. त्याने त्याच्या पत्नीसोबत अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवले होते, ज्यामध्ये दोन्ही हनीमूनचा समावेश होता. असं तो म्हणाला.
advertisement
उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने म्हटलं की, पती वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ आहे, त्याच्या नपुंसकतेबद्दल किंवा त्याने लग्नात फसवणूक केल्याचा दावा करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. वैद्यकीय नोंदी आणि तिच्या स्वतःच्या वर्तनातून वेगळं दिसून येत असताना, लग्नाच्या पाच वर्षांनंतर पत्नी पती नपुंसक असल्याचा दावा करू शकत नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
दोनदा हनीमून, पण नवरा खूश करू शकला नाही, बायकोची कोर्टात धाव, काय लागला निकाल?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement