अजब प्रकरण! करोडपती बाप लेकीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडला, मुलांनाही जन्म दिला, कसा काय?

Last Updated:

Relationship News : 54 वर्षीय बिझनेस टायकून बॅरी डेविट-बार्लो आणि 31 वर्षांचा स्कॉट हचिन्सन हे कपल सध्या चर्चेत आलं आहे. यानंतर त्यांना आपलं कुटुंब वाढवायचं होतं, यासाठी त्यांनी जे केलं ते आणखी धक्कादायक आहे.

News18
News18
लंडन : परदेशात नातेसंबंधांची समीकरणं खूपच विचित्र असतात. लोक त्यांच्या नातेवाईकांच्या प्रेमात पडतात.  अलिकडेच एका बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. कारण एका करोडपती बापाला त्याच्याच मुलीचा बॉयफ्रेंड आवडला आहे, तो त्याच्या प्रेमात पडला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दोघांनी दोन मुलांनाही जन्म दिला आहे.
ब्रिटनमधील 54 वर्षीय बिझनेस टायकून बॅरी डेविट-बार्लो आणि 31 वर्षांचा स्कॉट हचिन्सन हे कपल सध्या चर्चेत आलं आहे. यानंतर त्यांना आपलं कुटुंब वाढवायचं होतं, यासाठी त्यांनी जे केलं ते आणखी धक्कादायक आहे. बॅरी डेविट-बार्लो यांनी अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना कुरूप होण्यापासून वाचवण्यासाठी पैसै देऊन एग्ज डोनर म्हणून एका मॉडेलची निवड केली.
advertisement
त्यांनी एक सुंदर मॉडेल शोधली. त्यानंतर त्यांनी तिला 50 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 40 लाख रुपये दिले आणि तिला आई होण्यासाठी तयार केलं.
स्टेसी डूली स्लीप्स ओव्हर या टीव्ही शोमध्ये बॅरी डेविट-बार्लो म्हणाले, "कुणालाही कुरूप मूल नको असतं. जेव्हा मी मियामी फॅशन शोमध्ये त्या मॉडेलला कॅटवॉक करताना पाहिलं तेव्हा मला खात्री पटली की मला तिचे जीन्स हवे आहेत. जेव्हा मी तिला रॅम्पवर पाहिलं तेव्हा तिचे पाय इतके लांब होते की मी थक्क झालो. स्कॉट हचिन्सन मॉडेलच्या सौंदर्याने इतके प्रभावित झाले होते कीठरवलं की आमच्या भावी मुलांचंही असंच स्वरूप असावं."
advertisement
सरोगसीद्वारे मुलं झाली. बॅरी आणि स्कॉटला आता दोन मुलं आहेत. 4 वर्षांची मुलगी व्हॅलेंटिना आणि 3 वर्षांचा मुलगा रोमियो. दोन्ही मुलं एकाच मॉडेलच्या अंड्यातून जन्माला आली. बॅरीने स्पष्टपणे सांगितलं की त्याने तिची निवड बुद्धिमत्ता किंवा इतर गुणांवर नव्हे तर फक्त सौंदर्यावर आधारित केली आहे.
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, त्यांच्या विधानाचा व्हिडिओ टिकटॉकवर 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. लोक दोन गटात विभागले गेले. काहींनी बॅरीचं समर्थन केलं आणि म्हटलं की प्रत्येक पालक त्यांच्या मुलांना आकर्षक आणि हुशार पाहू इच्छितात. त्याच वेळी बहुतेक युझर्सनी त्यांच्या विचारसरणीचे वर्णन अहंकारी, भयंकर आणि वेडेपणा असं केलं. काहींनी तर याचा संबंध युजेनिक्सशी जोडला, म्हणजेच मानवांच्या कृत्रिम निवडीच्या प्रक्रियेशी, ज्यामध्ये इच्छित गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रजनन केलं जातं.
advertisement
लोकांनी बॅरीला खूप ट्रोल केलं पण तो म्हणाला की त्याला कोणाचीही पर्वा नाही. "लोक म्हणतात की मी एक मूल विकत घेत आहे, तर हो, जर एखादी महिला महिनाभर औषधं घेतल्यानंतर 50 हजार डॉलर्सच्या बदल्यात एग्ज डोनेट करते, तर त्यात काय गैर आहे?" बॅरी म्हणतो की प्रत्येकजण आपल्या मुलांना चांगली संधी देऊ इच्छितो आणि सौंदर्य देखील त्याचा एक भाग आहे.
advertisement
बॅरी एक समलिंगी पुरुष आहे.  1990 च्या दशकात तो त्याचा माजी पती टोनीसह ब्रिटनचा पहिला समलिंगी बाबा बनला, ज्याने सरोगसीद्वारे मुलांचं स्वागत केलं. आता त्याचा नवीन जोडीदार स्कॉट जो त्याच्या मोठ्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंडदेखील आहे, त्याच्यासोबत, तो पुन्हा एकदा वडील झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अजब प्रकरण! करोडपती बाप लेकीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडला, मुलांनाही जन्म दिला, कसा काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement