होबोसेक्शुअलिटी डेटिंगची नवी पद्धत; काय आहे का नवा प्रकार, कसं असतं, यात होतं काय?

Last Updated:

Relationship Story : आधुनिक डेटिंगमध्ये होबोसेक्सुअलिटी हा एक मनोरंजक ट्रेंड आहे. हा शब्द थोडा विचित्र वाटेल, परंतु त्यामागील विज्ञान आणि मानसशास्त्र नातेसंबंधांमधील अस्तित्व, जवळीक आणि अवलंबित्वाचे सखोल सत्य प्रकट करतं.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आजकाल नातेसंबंध आणि प्रेम अधूनमधून बदलत असतं. तुम्हाला कधीच कळत नाही की कोण तुमच्यावर खरोखर प्रेम करतं आणि कोण तुमच्यावर प्रेम करण्याचा आव आणत आहे. या प्रेमात लोकांची ं दररोज तुटत राहतात आणि एक होत जातात. जे लोक खरोखर प्रेम करतात त्यांना फक्त त्या व्यक्तीच्या प्रेमाची, सहवासाची आणि आत्मीयतेची काळजी असते. त्याचवेळी असे काही लोक आहेत जे त्यांच्या जोडीदारावर कमी प्रेम करतात परंतु त्यांचे पैसे, गाडी, घराच्या चाव्या जास्त आवडतात. आजकाल प्रेम आणि लग्नात आता होबोसेक्शुअलिटी हा नवीन फंडा जोरदारपणे ट्रेंड करत आहे.
नातं परिपूर्ण, आनंदी, समाधानी बनवण्यासाठी, आर्थिक स्थिरता आवश्यक असते, तसेच परस्पर प्रेम, आपुलकी, आसक्ती, एकमेकांबद्दल प्रामाणिकपणा देखील खूप महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचा जोडीदार देखील तुमच्यावर खरोखर प्रेम करतो की फक्त तुमचे पैसे की घराच्या चाव्या? आजच्या काळात या प्रकारच्या प्रेम आणि नात्याला होबोसेक्शुअलिटी असं नाव देण्यात आलं आहे. शेवटी होबोसेक्सुअलिटी म्हणजे काय आणि नातेसंबंधात त्यामागील विज्ञान काय आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्ही फसवणूक टाळू शकाल.
advertisement
लखनऊ येथील डॉ. एस.के. जैन बर्लिंग्टन क्लिनिकमधील सेक्सोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागार प्रो. (डॉ.) सरांश जैन यांच्या मते, आधुनिक डेटिंगमध्ये होबोसेक्सुअलिटी हा एक मनोरंजक ट्रेंड आहे. हा शब्द थोडा विचित्र वाटेल, परंतु त्यामागील विज्ञान आणि मानसशास्त्र नातेसंबंधांमधील अस्तित्व, जवळीक आणि अवलंबित्वाचे सखोल सत्य प्रकट करतं. होबोसेक्सुअलिटी खरं प्रेम आणि सोयीस्कर नातं यांच्यातील फरक सांगतं.
advertisement
वैज्ञानिकदृष्ट्या होबोसेक्सुअलिटी हे वैद्यकीय निदान नाही तर एक वर्तनात्मक पद्धत आहे. ती म्हणजे अशी व्यक्ती जी प्रामुख्याने घर किंवा आर्थिक सुरक्षिततेसाठी आपल्या जोडीदारामध्ये जवळीक शोधते. सोप्या भाषेत सांगायचं तर होबोसेक्सुअलिटी म्हणजे अशी व्यक्ती जी प्रेमसंबंध किंवा लैंगिक जोडीदार शोधते कारण ते त्यांच्या डोक्यावर छप्पर देतात. अशा प्रवृत्ती किंवा विचार संधीसाधू वाटू शकतात, असं डॉ. जैन यांनी सांगितली
advertisement
होबोसेक्शुअलिटी मागील मानसशास्त्र
मुळात, होबोसेक्शुअलिटी ही नेहमीच फसवणूक नसते, परंतु कधीकधी ती भीती आणि जगण्याची गरज यांच्याशी जोडलेली असते. मानसिक दृष्टिकोनातून, अशा नातेसंबंधात सहभागी असलेले लोक खालील कारणांमुळे असे करू शकतात:
अवलंबित्व सिद्धांत : मानसशास्त्रात हे स्पष्ट करतं की बालपणात असुरक्षिततेच्या किंवा दुर्लक्षाच्या अनुभवांमुळे काही लोक इतरांवर जास्त अवलंबून राहण्याची पद्धत कशी विकसित करतात.
advertisement
ताणतणावाचे न्यूरोबायोलॉजी : अस्थिर राहणीमानामुळे कॉर्टिसोल (तणाव संप्रेरक) वाढतं, ज्यामुळे लोक शारीरिक जवळीक साधून आराम मिळवतात, जरी ते नातं खरं नसलं तरीही.
एकटेपणाची भीती : कधीकधी लोकांना एकटं राहण्याची भीती वाटते, ज्यामुळे सोयीचं नातं काहीही नसण्यापेक्षा चांगलं वाटतं.
advertisement
जेव्हा एका जोडीदाराला नात्यात असं वाटतं तेव्हा दुसऱ्या जोडीदारावर त्याचा खोलवर परिणाम होतो. यामुळे नाराजी, भावनिक थकवा आणि हे नाते खरे आहे की नाही याबद्दल गोंधळ निर्माण होऊ शकतो.
होबोसेक्शुअलिटी का वाढत आहे?
आर्थिक दबाव : संशोधनातून असं दिसून आलं आहे की आर्थिक अस्थिरता हे नातेसंबंधांमध्ये अवलंबित्वाचं एक प्रमुख कारण आहे. शहरी भागात घरांच्या किमती गगनाला भिडत असल्याने जोडीदारासोबत राहणं कधीकधी प्रेमापेक्षा रणनीतीसारखं वाटू शकतं.
advertisement
अटॅचमेंट स्टाईल : अटॅचमेंट थिअरीनुसार जे लोक चिंताग्रस्त किंवा जास्त अवलंबून असतात ते होबोसेक्सुअल वर्तनाला अधिक प्रवण असतात. ते जवळीकतेला सुरक्षिततेशी जोडतात. त्यांच्या अपूर्ण सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी ते जोडीदार शोधतात.
आधुनिक डेटिंग अॅप्स : स्वाइप संस्कृतीच्या गतीने नातेसंबंधांमध्ये जवळीक साधण्याची वेळ वेगवान झाली आहे. संशोधन असं दर्शवतं की नातेसंबंधांच्या सुरुवातीच्या टप्प्यात मागील दशकांपेक्षा आज सहवास अधिक सामान्य आहे, ज्यामुळे सोयीच्या नातेसंबंधांची शक्यता वाढते.
होबोसेक्शुअलिटी हानिकारक आहे का?
समाजशास्त्रीय अभ्यासातून असं दिसून आलं आहे की असे संबंध कधीकधी खऱ्या भागीदारीत बदलू शकतात. जेव्हा दोन्ही भागीदारांना याची चांगली जाणीव असते आणि ते एकमेकांना पूरक मार्गाने पाठिंबा देतात, तेव्हा ते आर्थिक ताण कमी करू शकते आणि जवळीक वाढू शकते.
जेव्हा नातेसंबंध शोषणाचे बनतात, तेव्हा असे नातेसंबंध हानिकारक ठरू शकतात, जिथं दुसऱ्या जोडीदाराला थकल्यासारखे, वापरलेले किंवा हे बंधन भावनिक आहे की केवळ व्यवहाराचे आहे याबद्दल गोंधळलेले वाटते. या असंतुलनामुळे नाराजी, विश्वासाचा अभाव आणि मानसिक ताण येऊ शकतो.
या लक्षणांवरून ओळखा की तुमचा जोडीदार होबोसेक्सुअल आहे की नाही?
थोड्या काळासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेणं. हे बहुतेकदा भावनिक नसून आर्थिक सोयीशी संबंधित असते.
जेव्हा जोडीदार सक्षम असूनही आर्थिक किंवा घरगुती जबाबदाऱ्या घेण्यास सतत टाळाटाळ करतो.
तुमचा जोडीदार एका लिव्ह-इन रिलेशनशिपमधून दुसऱ्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये खूप वेळा जात आहे.
भाडं किंवा बिल भरण्याची वेळ आली आणि त्यांचं तुमच्याबद्दलचं प्रेम अचानक वाढलं तर ते एक धोक्याचं लक्षण आहे.
दीर्घकालीन योजना बनवण्यापासून नेहमीच दूर राहणं, भविष्याबद्दल दिरंगाई किंवा अस्पष्टता हे बहुतेकदा सोयी-आधारित नातेसंबंधाचं लक्षण असतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
होबोसेक्शुअलिटी डेटिंगची नवी पद्धत; काय आहे का नवा प्रकार, कसं असतं, यात होतं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement