तासनतास रोमान्स करणारी गर्लफ्रेंड जवळच घेईना, डॉक्टरांनी सांगितलं असं कारण, बॉयफ्रेंड धक्क्यात

Last Updated:

Relationship News : एक काळ असा होता जेव्हा महिला स्वतःला खूपच रोमँटिक समजत असे, पण काही वर्षांपूर्वी सर्वकाही बदललं. लियानची शरीरसंबंधाची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली. शरीरसंबंधात तिला काहीच रस राहिला नाही. यामागील कारण भयानक होतं.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : पती-पत्नी असो किंवा प्रियकर-प्रेयसी जर त्यांच्यात प्रेमसंबंध टिकून राहिले तर नातंही मजबूत राहतं. पण काही कारणामुळे या नात्यात दुरावा येतो. असंच घडलं ते एका कपलसोबत. बेडरूममध्ये कित्येक तास रोमान्स करणारी गर्लफ्रेंड अचानक दूर दूर राहू लागली. बॉयफ्रेंडला जवळच घेत नव्हती. यामुळे बॉयफ्रेंडलाही टेन्शन आलं. त्याने तिला डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी जे कारण सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
ब्रिटनमधील हे प्रकरण आहे. 42 वर्षांची ही महिला, लियान जोन्स असं तिचं नाव आहे. ती तिचा 40 वर्षांचा बॉयफ्रेंड अॅडमसोबत राहते. दोघंही कित्येक तास बेडरूममध्ये रोमान्स करायचे. एक काळ असा होता जेव्हा लियान स्वतःला खूपच रोमँटिक समजत असे, पण काही वर्षांपूर्वी सर्वकाही बदललं. लियानची शरीरसंबंधाची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली. शरीरसंबंधात तिला काहीच रस राहिला नाही.
advertisement
कामवासना कमी होण्यासोबतच लिआनला खूप थकवा, श्रवणशक्ती कमी होणं आणि इतर शारीरिक समस्यांचाही अनुभव येऊ लागला. लिआनला बोलण्यात, चालण्यात आणि पाहण्यातही त्रास होतो.
या बदलामुळे त्यांच्या नात्यावरही परिणाम झाला. त्यामळे कपलने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली आणि नंतर धक्कादायक कारण समोर आलं.
advertisement
मेडिकल रिपोर्टमध्ये लिआनला दोन आजार असल्याचं समजलं. एक म्हणजे मल्टीपल स्क्लेरोसिस (एमएस). हा आजार मेंदू आणि पाठीच्या कण्यावर परिणाम करतो. दुसरा आजार फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. जो मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमधील सिग्नल पाठवण्याच्या आणि प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणतो.
advertisement
या आजारांमुळे तिच्या मेंदू आणि शरीरातील न्यूरल कनेक्शन तुटले, जे उत्तेजना, संवेदना आणि कामोत्तेजनासाठी आवश्यक आहे. लियानच्या बॉयफ्रेंडलाही डॉक्टरांनी कारण नीट सांगितलं. आता लियान सोशल मीडियावर या आजाराबाबत माहिती देत जागरूकता पसरवत आहेत.
मराठी बातम्या/Viral/
तासनतास रोमान्स करणारी गर्लफ्रेंड जवळच घेईना, डॉक्टरांनी सांगितलं असं कारण, बॉयफ्रेंड धक्क्यात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement