मृत गर्लफ्रेंडचा मोबाईल वापरत होता बॉयफ्रेंड, 8 महिन्यांनंतर सापडला मृतदेह

Last Updated:

Girlfriend Boyfriend News : अनेक महिने तो लोकांच्या नजरेतून संशयापासून दूर राहिला. पण फोन लोकेशन आणि एटीएमच्या वापरामुळे अखेर त्याचं रहस्य उलगडलं.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
नवी दिल्ली : एखादी व्यक्ती मृत झाली की तिचा मोबाईल फेकून देत नाही. तर दुसरं कुणीतरी तो मोबाईल वापरतं. असाच एक तरुण जो त्याच्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल वापरत होता. अखेर 8 महिन्यांनी मृतदेहच सापडला. ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे, जिने सगळ्यांना हादरवून टाकल आहे.
भुवनेश्वरच्या भरतपूर भागातील राहणारी 27 वर्षांची निरुपमा परिदा उर्फ ​​मीता एका घरात केअरटेकर म्हणून काम करत होती. ती 24 जानेवारी रोजी तिच्या कुटुंबाशी शेवटची बोलली. त्या दिवशी मीताने तिच्या वडिलांना आणि भावाला सांगितलं की ती तिच्या मूळ गावी रानपूरला परतत आहे. पण ती तिथं कधीच पोहोचली नाही. त्या दिवसापासून तिचा मोबाईल फोन अनेक वेळा चालू आणि बंद होत राहिला.
advertisement
कुटुंबाने 27 जानेवारी रोजी भरतपूर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्तातेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला पण काही महिने सुगावा लागला नाही. नंतर पोलिसांना काही इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडल्याने एक नवीन वळण मिळालं. तपासात असं दिसून आलं की मिताचा मोबाईल आणि एटीएम दुसराच कोणीतरी वापरत होता. सतत पाळत आणि चौकशी केल्यानंतर पोलीस देबाशिष बिसोई नावाच्या तरुणापर्यंत पोहोचले. देबाशिष हा मीताचा बॉयफ्रेंड होता.
advertisement
पोलीस आयुक्त सुरेश देवदत्त सिंह यांनी सांगितलं की, चौकशीनंतर देबाशिषने सत्य कबूल केलं. त्याने सांगितले की त्याला संशय होता की मीताचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. या संशयामुळे तो आंधळा झाला आणि त्याने एक धोकादायक कट रचला. हत्येच्या दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी देबाशिषने मीताला खुर्दाच्या तपांग परिसरातील एका निर्जन खाणीच्या खड्ड्यात नेलं. तिथे संधी मिळताच त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच खड्ड्यात मृतदेह फेकून दिला. यानंतर त्याने मीताचा मोबाईल आणि एटीएम स्वतःकडे ठेवलं आणि ते वापरत राहिला.
advertisement
अनेक महिने तो लोकांच्या नजरेतून संशयापासून दूर राहिला. पण फोन लोकेशन आणि एटीएमच्या वापरामुळे अखेर त्याचं रहस्य उलगडले.  शुक्रवारी पोलिसांनी तपांग परिसरातील त्याच खोल खड्ड्यातून मीताचा कुजलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची स्थिती खूपच वाईट होती, पण तिच्या वडिलांनी आणि भावाने तिच्या कपड्यांवरून आणि सामानावरून तिची ओळख पटवली. पोलिसांनी देबाशिषला अटक केली आहे. त्याच्याकडे मिताची पर्स, बॅग आणि एटीएम कार्ड सापडलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मृत गर्लफ्रेंडचा मोबाईल वापरत होता बॉयफ्रेंड, 8 महिन्यांनंतर सापडला मृतदेह
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement