टीम इंडिया वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचणार का? सेमीफायनलचे समीकरण क्लिअर, कोणाशी भिडणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडचा पराभव करून टीम इंडिया महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. यानंतर आता भारतीय टीम सेमी फायनलमध्ये कुणाविरुद्ध खेळणार हेदेखील स्पष्ट झालं आहे.
नवी मुंबई : न्यूझीलंडचा पराभव करून टीम इंडिया महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप सेमी फायनलला पोहोचणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांच्या शतकांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला धूळ चारली आणि सेमी फायनलचं तिकीट पक्कं केलं आहे. याचसोबत न्यूझीलंडचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.
टीम इंडिया ही वर्ल्ड कप सेमी फायनलला पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे, त्यामुळे सेमी फायनलचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत या सेमी फायनलला पोहोचणाऱ्या 4 टीम ठरल्या आहेत. सेमी फायनलला पोहोचल्यानंतर आता टीम इंडिया कुणाविरुद्ध खेळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
असं आहे सेमी फायनलचं गणित
advertisement
सेमी फायनलला पोहोचलेल्या चारही टीमनी प्रत्येकी 6-6 सामने खेळले असून त्यांचा एक सामना शिल्लक आहे. यातला एक सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. तर इंग्लंडचा सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 11, दक्षिण आफ्रिकेचे 10, इंग्लंडचे 9 आणि भारताचे 6 पॉईंट्स आहेत, त्यामुळे टीम इंडिया ग्रुप स्टेज संपल्यानंतरही चौथ्या क्रमांकावरच राहणार आहे.
advertisement
सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची लढत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या टीमविरुद्ध होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनल होईल. तसंच दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमी फायनलची लढत होईल. ग्रुप स्टेजमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला अशा चुका करून चालणार नाही, अन्यथा वर्ल्ड कप जिंकण्याचं त्यांचं स्वप्न सेमी फायनलमध्येच संपुष्टात येईल.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
October 23, 2025 11:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडिया वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचणार का? सेमीफायनलचे समीकरण क्लिअर, कोणाशी भिडणार!


