मुंडेंचा खरा वारसदार कोण? नेते भांडत बसले, पण धनूभाऊ-पंकुताईंनी क्लिअर केलं, Video

Last Updated:

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी एकत्र भाऊबीज साजरी केली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मुंबई : पंकजा मुंडेंना जनतेनं वारसदार केलंय, असं वक्तव्य करत प्रकाश महाजनांनी छगन भुजबळांवर तोफ डागली. मुंडे भावा-बहिणीत मिठाचा खडा टाकू नका, असंही महाजनांनी सुनावलं. भुजबळ बीडमध्ये ओबीसींमध्ये भांडणं लावायला होते का, असा सवालही त्यांनी विचारला. छगन भुजबळांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात केलेल्या या वक्तव्याचा प्रकाश महाजनांनी जोरदार समाचार घेतला. गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारावरून सुरू असलेल्या चर्चेत प्रकाश महाजनांनी फेसबुक पोस्ट टाकून त्यांचं मत व्यक्त केलं. एकीकडे वारसदार कोण ही चर्चा रंगलेली असताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी एकत्र भाऊबीज साजरी केली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून विरोधकांना उत्तर दिले आहे.
स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे. एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला. आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो. फक्त आणि फक्त माझी पंकू ताई. दुसरे कोणी नाई. अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंकजा मुंडेंना संपवायला आलेले अनेक जण स्वतः संपलेत हे लक्षात ठेवा, असा इशाराही प्रकाश महाजनांनी दिला.
advertisement

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? 

प्रकाश महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार पंकजा मुंडेच असल्याचं ठणकावून सांगितलं. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नेतृत्व कुणाच्या हातात आहे, याकडे एक प्रकारे प्रकाश महाजनांनी अंगुलीनिर्देश केला. तर अनेकदा पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनीही पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असल्याचं सांगितलं. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केले आहेत. भुजबळांना मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? अशी टीका जरांगे पाटलांनी केली.
advertisement

प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?

गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची भक्कमपणे साथ दिली होती. मात्र बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला आता प्रकाश महाजनांनी छेद दिलाय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंडेंचा खरा वारसदार कोण? नेते भांडत बसले, पण धनूभाऊ-पंकुताईंनी क्लिअर केलं, Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement