Wine Fact : वाइन कधीच खराब होत नाही असं तुम्ही पण आतापर्यंत समजत होतात का? थांबा हे कसं ओळखायचं आधी जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
वाईन जितकी जुनी तितकी तिची चव चांगली आणि ते बरोबर देखील आहे. पण याचा अर्थ असा नाही की वाईन कधीच खराब होत नाही. वाईन देखील खराब होते. हे त्याची चव आणि टेक्चरवरुन कळतं. पण अनेकांना याची माहिती नसल्यामुळे ओळखता येत नाही.
advertisement
अनेकांना वाटतं की वाइन जितकी जुनी, तितकी चांगली. पण हे नेहमीच खरं नसतं. काही वाइन काळानुसार अजून मऊ, समृद्ध आणि स्वादिष्ट बनतात, तर काहींचा स्वाद आणि सुगंध बिघडतो. अशा वेळी लोक गोंधळतात. "ही वाइन एक्सपायर झाली का?" किंवा "तिचा स्वाद असा का वाटतोय?" याच प्रश्नांची उत्तरे वाइन एक्सपर्ट सोनल हॉलंड यांनी दिली आहेत. त्यांच्यानुसार वाइन खराब झाली आहे की नाही हे ओळखणं कठीण नाही, फक्त काही लक्षणं लक्षात ठेवावी लागतात.
advertisement
वाइन खराब का होते?सोनल हॉलंड सांगतात की वाइन अनेक कारणांनी खराब होऊ शकते. जर वाइन थेट सूर्यप्रकाशात आली, तर तिच्या आत रासायनिक प्रतिक्रिया होतात आणि तिचा स्वाद बदलतो. हवेचा संपर्क आला की वाइनचा फ्लेवर बिघडतो आणि ऑक्सिडेशन सुरू होतं. चुकीच्या तापमानात साठवणही वाइनचं नुकसान करतं. म्हणून वाइन योग्य जागी, नियंत्रित तापमानात आणि बंद बाटलीत साठवणं खूप गरजेचं असतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


