Mumbai Local Update : मुंबई लोकल आता 'सुपरफास्ट एक्सप्रेस'च्या वेगात धावणार; मध्य रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण
Last Updated:
Mumbai Local Train Update : कर्जत स्टेशन यार्ड रिमॉडेलिंग पूर्ण झाल्यानंतर 88 लोकल आणि 100 पेक्षा जास्त एक्स्प्रेस ट्रेन वेळेत चालतील. यामुळे प्रवाशांना कामावर लेट होण्याची चिंता नाही आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. याच शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांना आता कामावर लेट होण्याची समस्या कमी होणार आहे. कर्जत स्टेशनवर सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प अखेर पूर्ण झाला असून त्यासाठी मोठा खर्च करण्यात आलेला आहे.
प्रवासाचा वेळ कमी होणार
आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग प्रणाली सुरू झाल्यामुळे सीएसएमटी, खोपोली आणि पनवेल मार्गे धावणाऱ्या 88 लोकल तसेच 100 पेक्षा जास्त एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात सुधारणा होणार आहे. प्रवाशांना आता 5 ते 10 मिनिटांनी वेळेवर प्रवास करण्याची सोय मिळणार आहे.
यार्ड रिमॉडेलिंगसाठी काही दिवसांपूर्वी 15 तासांहून अधिक कालावधीचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या रिमॉडेलिंगमुळे यार्डची क्षमता 25 टक्क्यांने वाढली आहे. कर्जत-पळसदरी दरम्यान नवीन चौथा मार्ग तयार झाला असून यामुळे खोपोली आणि पनवेल मार्गे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाड्या आणि एक्स्प्रेस आता कर्जत मार्गावरून जाण्याची गरज नाही.
advertisement
कोणती महत्त्वाची काम पूर्ण करण्यात आली?
रिमॉडेलिंगमध्ये एकूण 487 रूट्स,46 मुख्य सिग्नल आणि 39 शंट सिग्नल अद्ययावत करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी ड्युअल डिटेक्शन सिस्टम बसवण्यात आली असून कर्जत-भिवपुरी दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग राबवण्यात आले आहे. याशिवाय, रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी इफ्ट्रॉनिक्स डेटा लॉगर प्रणाली लागू करण्यात आली आहे ज्यामुळे कोणत्याही समस्येवर तत्काळ लक्ष ठेवता येणार आहे.
advertisement
यार्डच्या सुधारणा अंतर्गत 8 पूलांचे विस्तार, 2 फूटओवर ब्रिजचे विस्तार तसेच 4.9 किलोमीटर नवीन ट्रॅक जोडणी करण्यात आली आहे. 9 ट्रॅक किलोमीटर अंतराची नवीन ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरिंग, 350 मास्ट उभारणी आणि यार्डचे पूर्ण विद्युतीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, 20 नवीन टर्नआउट्स बसवण्यात आले असून 8 जुने टर्नआउट्स काढून टाकले गेले आहेत, ज्यामुळे ट्रॅकवरील गाड्यांचा प्रवाह अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल.
advertisement
मुंबईकरांसाठी हा बदल खूप महत्वाचा आहे कारण शहरातील लोकल प्रवास रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कर्जत स्टेशन आणि त्याच्या यार्डचे हे रिमॉडेलिंग प्रकल्प, प्रवाशांच्या वेळेची बचत करण्यास, गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी आणि रेल्वे संचालन अधिक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. आता प्रवाशांना वेळेवर पोहोचण्याची चिंता कमी होणार असून, मुंबई लोकल प्रवास आणखी सुरक्षित आणि आरामदायी होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 10:44 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Update : मुंबई लोकल आता 'सुपरफास्ट एक्सप्रेस'च्या वेगात धावणार; मध्य रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण