Diwali Cleaning : दिवाळीपूर्वी लाकडी फर्निचर करा पॉलिश, 'या' 5 उपायांनी विनाखर्च चमकवा तुमचा सोफा..

Last Updated:
Diwali furniture cleaning tips : दिवाळी जवळ आली आहे आणि प्रत्येक घर सजवण्याची आणि स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. लाकडी फर्निचरची चमक आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे विशेषतः महत्वाचे आहे. जेणेकरून घराचा प्रत्येक कोपरा फ्रेश आणि चमकदार दिसेल. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे सोफा, दरवाजे, डेस्क आणि इतर लाकडी फर्निचरला पैसे खर्च न करता एक नवीन लूक देऊ शकता आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवू शकता.
1/5
तुमच्या घरात सोफा, बेडरूमचे दरवाजे आणि बैठकीच्या खोलीमध्ये लाकडी फर्निचर असेल तर हे तुम्ही सहज स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल समान प्रमाणात मिसळा आणि ते मऊ कापडाने फर्निचरवर घासून घ्या. यामुळे धूळ आणि जुनी घाण निघून जाईल आणि लाकडाची नैसर्गिक चमक परत येईल.

advertisement
2/5
तुमचे लाकडी फर्निचर स्वच्छ करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे एक भाग व्हिनेगर आणि तीन भाग पाणी मिसळून वापरणे. यामुळे केवळ धूळच निघणार नाही तर कीटक देखील दूर राहतील. ही पद्धत विशेषतः अशा फर्निचरसाठी योग्य आहे, जी बर्याच काळापासून वापरली जात नाही आणि घाण दिसत आहेत.

3/5
तुमच्या घरातील फर्निचर स्वच्छ करण्यासाठी नारळाचे तेल लाकडासाठी नैसर्गिक पॉलिश म्हणून काम करते. थोडेसे तेल लावा आणि कोरड्या कापडाने हलक्या हाताने घासा. यामुळे फर्निचरची चमक बराच काळ टिकेल.

4/5
तुमच्या फर्निचरवर ओरखडे किंवा डाग असतील तर बेकिंग सोडा थोडे पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागात लावा. थोड्या वेळाने ते स्वच्छ कापडाने पुसा. तुमचे फर्निचर पुन्हा नव्यासारखे दिसेल.

5/5
बाजारात उपलब्ध असलेले लाकडी मेणाचे पॉलिश हे तुमच्या फर्निचरला फ्रेश लूक देण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हलक्या कापडाने पॉलिश करा आणि फर्निचर सुकल्यानंतर चमकेल. स्वच्छ केल्यानंतर फर्निचरला काही काळ सूर्यप्रकाशात ठेवा जेणेकरून कोणताही ओलावा दूर होईल.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement