Mumbai One App : Mumbai One अ‍ॅपमुळे प्रवास झाला सोपा! जाणून घ्या हे अ‍ॅप कसे वापरायचे आणि काय सुविधा मिळतात

Last Updated:

How To Use Mumbai One App : मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी ‘मुंबई वन’ अॅप सादर करण्यात आले आहे. या अॅपद्वारे मेट्रो, बस, स्थानिक रेल्वे अशा सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच ठिकाणी तिकीट घेता येते.

News18
News18
मुबंई : मुंबईसारख्या महानगरात रोज लाखो प्रवासी विविध सार्वजनिक वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बसेस, स्थानिक गाड्या अशा अनेक सेवांचा एकत्रित वापर करताना तिकिट घेण्याची अडचण, वेळेचा अपव्यय आणि रांगा या गोष्टी नेहमीच त्रासदायक ठरतात. मात्र, आता हे सगळं त्रासमुक्त आणि डिजिटल पद्धतीने होणार आहे, कारण आले आहे 'मुंबई वन'हे अत्याधुनिक मोबाईल अ‍ॅप.
हे अ‍ॅप नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी तिकीट घेण्याची, प्रवास नियोजन करण्याची आणि पेमेंट करण्याची सुविधा देते. चला तर जाणून घेऊया हे अ‍ॅप कसे वापरायचे आणि त्यातील खास वैशिष्ट्ये कोणती आहेत.
1)अ‍ॅप कसे वापरायचे?
सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा पल प्ले स्टोअरवर जाऊन मुंबई वन हे अ‍ॅप डाउनलोड करा.
अ‍ॅप उघडल्यानंतर मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडीद्वारे साइन इन करा.
advertisement
मुख्य पानावर तुम्हाला विविध परिवहन सेवा दिसतील, जसे की मेट्रो, मोनोरेल, बेस्ट, उपनगरी रेल्वे इत्यादी.
तुम्हाला ज्या सेवेचा वापर करायचा आहे, ती निवडा. जर तुमचा प्रवास अनेक वाहतूक साधनांद्वारे होणार असेल (उदा. मेट्रो आणि बस), तर अ‍ॅप तुमच्यासाठी स्वयंचलित बहुविध प्रवास योजना तयार करेल.
तिकीट घेण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा आणि त्यानंतर तुमच्यासाठी क्युआर कोड आधारित डिजिटल तिकीट तयार होईल. हा क्युआर कोड तुम्ही गेटवर स्कॅन करून प्रवास सुरू करू शकता. त्यामुळे आता पेपर तिकिटे किंवा पास बाळगण्याची गरज उरत नाही.
advertisement
2) अ‍ॅपशी जोडलेल्या सेवा
मुंबई वन अ‍ॅप विविध परिवहन यंत्रणांना एकत्र आणते. त्यामध्ये मुंबई मेट्रो 1, 2A आणि 7 मार्गिका तसेच
मुंबई मोनोरेल, बेस्ट उपक्रम बस सेवा ,मुंबई उपनगरी रेल्वे (पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईन) ,ठाणे महापालिका परिवहन आहे तसेत मिरा-भाईंदर महापालिका परिवहन ,कल्याण-डोंबिवली परिवहन ,नवी मुंबई महापालिका परिवहन, नवी मुंबई मेट्रो या सर्व सेवा अ‍ॅपपमध्ये जोडल्यामुळे प्रवाशांना शहरभर सहज, अखंड प्रवासाचा अनुभव मिळतो.
advertisement
3)प्रवासाचे नियोजन आणि रिअल टाइम माहिती
अ‍ॅपमध्ये रिअल टाइम ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशाला कमीतकमी वेळेत कोणत्या मार्गाने प्रवास करता येईल हे अ‍ॅप सांगते. वाहतुकीची स्थिती, आगमनाची वेळ, थांबे, मार्गातील बदल याची माहिती त्वरित मिळते. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करणे आता अगदी सोपे झाले आहे.
4) त्रिभाषिक सुविधा
मुंबई वन हे अ‍ॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही पार्श्वभूमीचा प्रवासी हे अ‍ॅप सहज वापरू शकतो. यामध्ये प्रवाशांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन आणि सुरक्षा माहितीही उपलब्ध आहे.
advertisement
5)पेमेंटसाठी बहुविध पर्याय
या अ‍ॅपमध्ये तिकीट खरेदीसाठी रोख रकमेव्यतिरिक्त विविध डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. यात यूपीआय, भीम यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, डिजिटल वॉलेट आणि इंटरनेट बँकिंगचा समावेश आहे. या सर्व माध्यमांतून पेमेंट करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
6)सोयीस्कर, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव
मुंबई वन अ‍ॅपच्या मदतीने आता मुंबईतील प्रवास खरोखरच सोयीस्कर झाला आहे. कागदी तिकिटांची चिंता नाही, रोख रकमेची गरज नाही आणि वेगवेगळ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र पासही लागत नाही. हे अ‍ॅप म्हणजे मुंबईकरांसाठी एकच स्मार्ट ट्रॅव्हल सोल्युशन जे वेळ, पैसा आणि श्रम सर्वच वाचवते. एकूणच मुंबई वन अ‍ॅपने मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक आधुनिक, डिजिटल आणि वन स्टॉप सोल्युशन दिलं आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai One App : Mumbai One अ‍ॅपमुळे प्रवास झाला सोपा! जाणून घ्या हे अ‍ॅप कसे वापरायचे आणि काय सुविधा मिळतात
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement