Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतींतूनच होणार निवडप्रक्रिया; अर्जाची लिंक बातमीत
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Canara Bank Bharti 2025: फायनान्स किंवा बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. कॅनरा बँकेमध्ये नोकरीची संधी आहे. सेल्स अँड मार्केटिंग विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे.
फायनान्स किंवा बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. कॅनरा बँकेमध्ये नोकरीची संधी आहे. सेल्स अँड मार्केटिंग विभागामध्ये प्रशिक्षणार्थी (Trainee Posts) पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भरतीप्रक्रियेचा शेवटचा दिवस 12 ऑक्टोबर 2025 आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी संपूर्ण देशभरामध्ये अनेक पदं आहेत. अंदमान- निकोबार सह संपूर्ण देशभरामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
कॅनरा बँकेमध्ये होणाऱ्या नोकरभरतीचा शेवटचा दिवसाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नोकरीसाठी नाही तर ट्रेनी पदासाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. तब्बल 3500 पदांसाठी कॅनरा बँकेमध्ये नोकर भरती होणार आहे. सेल्स अँड मार्केटिंग विभागामध्ये तरूणांसाठी नोकरभरती होत आहे. भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता प्राप्त कोणतीही समतुल्य पदवी हवी आहे. उमेदवारांकडे पदवी 01.01.2022 च्या पूर्वी आणि 01.09.2022 च्या नंतरची पदवी उमेदवाराकडे नकोय. या काळातच उमेदवार उत्तीर्ण झालेला असावा.
advertisement
ज्या उमेदवारांनी 10वी किंवा 12वीच्या गुणपत्रिका सादर केली आहेत, त्यांनी निवडलेल्या स्थानिक भाषेचा अभ्यास केल्याचा पुरावा म्हणून स्थानिक भाषा चाचणी देण्याची आवश्यकता नाही. इतर उमेदवारांसाठी, स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून घेतली जाईल. बँकेकडून उमेदवाराला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावल्यानंतर ती घेतली जाईल. या परीक्षेत अयशस्वी झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाणार नाही. अर्जदाराची वयोमर्यादा 20 ते 28 पर्यंतची आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5 वर्षांची सूट, इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट आणि अपंग व्यक्तींना 10 वर्षांची वयामध्ये सूट देण्यात आली आहे.
advertisement
नोकरीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड फक्त मुलाखतीच्या (Interview) आधारे केली जाईल. जाहिरातीमध्ये वेतनाची नेमकी रक्कम नमूद केलेली नसली तरी, ही नोकरी चांगला पगार मिळवून देणारी असेल असे नमूद केले आहे. कॅनरा बँकेच्या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून, अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी व्यवस्थित जाहिरातीची PDF वाचायची आहे. त्याप्रमाणेच अर्ज करायचा आहे. शिवाय, अर्जाची लिंकही बातमीमध्ये देण्यात आली आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 08, 2025 3:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतींतूनच होणार निवडप्रक्रिया; अर्जाची लिंक बातमीत