IND vs WI 2nd Test : गौतम गंभीर पार्टीमध्ये व्यस्त पण जिगरी मित्राचं करियर वाचवण्यासाठी शुभमन गिल थेट मैदानात!

Last Updated:

Shubman Gill working with Sai Sudharsan : साई सुदर्शनचे आकडे टीम इंडियाची चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे खास शुभमन गिलने साईला नेट्समध्ये बॅटिंगचं स्किल शिकवलं.

Shubman Gill working with Sai Sudharsan
Shubman Gill working with Sai Sudharsan
IND vs WI 2nd Test At Delhi : अहमदाबाद कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर आता सिरीज खिशात घालण्यासाठी टीम इंडिया दिल्लीत पोहोचली आहे. दिल्ली टेस्टसाठी खेळाडू सराव करताना घाम गाळताना दिसत आहेत. अशातच आता एका खेळाडूमुळे शुभमन गिलची डोकेदुखी वाढली आहे. शुभमन गिलला त्याच्यात जिगरी मित्रामुळे पराभवाचं तोंड पहायला लागू शकतं. त्यामुळे गंभीर पार्टी देण्यात व्यस्त असताना स्वत: शुभमन गिल मैदानात उतरला अन् जिगरी मित्राला बॅटिंगचे धडे दिले.

सात डावांमध्ये 147 धावा

शुभमन गिलचा हा जिगरी मित्र दुसरा तिसरा कुणी नसून साई सुदर्शन आहे. साई सुदर्शनचे आकडे टीम इंडियाची चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे खास शुभमन गिलने साईला नेट्समध्ये बॅटिंगचं स्किल शिकवलं. पुढील आठवड्यात 24 वर्षांचा होणारा सुदर्शनने आतापर्यंत सात डावांमध्ये 147 धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे साईचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय नक्कीच म्हणावा लागेल. मात्र, साई सुदर्शन नक्कीच टेस्ट क्रिकेटमध्ये कमाल करू शकतो.
advertisement

साईच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास

भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी साई सुदर्शनला खेळवण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितलं की, भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि संघ व्यवस्थापनाला साई सुदर्शनच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की सुदर्शनला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याला हे माहित आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याच्या धावसंख्येत मोठी खेळी जोडण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तो कसोटी संघात आपले स्थान टिकवून ठेवू शकेल.
advertisement

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी किती संधी?

दरम्यान, शुभमन गिल आणि साई सुदर्शन दोघंही आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतात. दोघांची बॅटिंग स्ट्रेन्थ देखील एकमेकांना माहिती आहे. अशातच आता इतर खेळाडू बेंचवर बसून असताना साईला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी किती संधी दिल्या जातील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 2nd Test : गौतम गंभीर पार्टीमध्ये व्यस्त पण जिगरी मित्राचं करियर वाचवण्यासाठी शुभमन गिल थेट मैदानात!
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement