Weather Alert: मुंबई-ठाण्यात हवा बदलली, कोकणात धो धो सुरूच, या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. दक्षिण कोकणात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून ठाणे-मुंबईत वेगळीच स्थिती जाणवत आहे.
1/5
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात कोकण किनारपट्टीसाठी दिलासा देणारी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. आज, 8 ऑक्टोबर 2025, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

advertisement
2/5
मुंबईत बुधवारी आकाश स्वच्छ आणि वातावरण गरम राहील. आज पुन्हा गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे परिसराला कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. दुपारच्या सुमारास उकाडा जाणवेल. आजचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असेल. वाऱ्याचा वेग सुमारे 10-12 किमी प्रतितास राहील.

3/5
पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल. सकाळपासूनच थोडी गार हवा असून सायंकाळपर्यंत वातावरणात कोणतेही महत्त्वाचे बदल होणार नाहीत. आज तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग 10 किमी प्रतितास असेल.

4/5
कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. रायगडमध्ये मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून सतर्कतेचा इशारा नाही. आजचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असेल.

5/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी हवामानात मोठे बदल जाणवतील. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर परिसरातून पावसाचा उघडीप राहील. तर दक्षिण कोकणात हलका ते मध्यम पाऊस होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 दिवस यलो अलर्ट असून उर्वरित जिल्ह्यांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement