Business Idea : दिवाळीसाठी आकर्षक वस्तू, 10 रुपयाला खरेदी करा अन् दुप्पट पैसे कमवा, व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी, Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. दिवाळी सजावटीच्या वस्तूंचा मोठा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेता मज्जिद बंदर येथील बलूनस शॉप या दुकानात विशेष दिवाळी सजावटीच्या वस्तूंचा मोठा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे दुकान अब्दुल रहमान स्ट्रीटच्या शेजारी, भाजीपाला गल्लीत 113 नंबरवर असून येथे सर्व वस्तू अत्यंत माफक दरात आणि होलसेलमध्ये विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
दुकानात लक्ष्मीच्या 10 पाऊलांची एक पट्टी केवळ 10 ला उपलब्ध आहे. याचे 10 पट्ट्यांचे एक बंडल 100 ला विक्रीस ठेवण्यात आले आहे. शुभ-लाभ स्टिकर्सच्या पट्ट्या 30, रंगीत रांगोळ्या 35 प्रति नग, रांगोळी स्टिकर्स 45 प्रति नग, 4 पणत्यांचा सेट 45 मध्ये मिळतो. याशिवाय विविध रंगांत रांगोळीचे 10 रंगांचे पॅक फक्त 70 मध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
या दुकानात इतरही अनेक आकर्षक सजावटीच्या वस्तूंचा समावेश असून सर्व वस्तू स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी असून व्यवसायिकांसाठीही होलसेलमध्ये खरेदी करून चांगला नफा मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
advertisement
बलूनस शॉप ही दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची सर्वसमावेशक बाजारपेठ ठरत आहे. ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या सणाला सजावटीच्या माध्यमातून एक वेगळीच झळाळी द्यावी, असे आवाहन दुकानदारांकडून करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 08, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Business Idea : दिवाळीसाठी आकर्षक वस्तू, 10 रुपयाला खरेदी करा अन् दुप्पट पैसे कमवा, व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी, Video









