Child Health : फक्त कफ सिरपच नाही! रोज खाल्ला जाणारा मुलांचा 'हा' फेव्हरेट पदार्थ आहे 'स्लो पॉइजन', पालकांसाठी धोक्याची घंटा

Last Updated:
आजकाल कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहे पण तुम्हीही तुमच्या मुलाला बिस्कीट देत असाल तर सावधान. प्रत्येक घरात बिस्कीट प्रत्येकाचं 'फेव्हरेट स्नॅक' बनलं आहे आणि खास करून लहान मुलांचं.
1/7
आजकाल कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहे पण तुम्हीही तुमच्या मुलाला बिस्कीट देत असाल तर सावधान. प्रत्येक घरात बिस्कीट प्रत्येकाचं 'फेव्हरेट स्नॅक' बनलं आहे आणि खास करून लहान मुलांचं. खेळून झालं की बिस्कीट, शाळेत जाताना आणि शाळेतून आलं की बिस्कीट अगदी बाहेर फिरायला गेले की बिस्कीट... पण हे बिस्कीट तुमच्या मुलांच्या आरोग्यवर कस आणि किती परिणाम करू शकत तुम्हाला माहिती आहे का?

advertisement
2/7
डॉ. रवी मलिक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी बिस्कीटमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल माहिती दिली आहे. डॉ. रवी मलिक यांनी स्पष्ट केले की बिस्किटे गिल्ट फ्री वाटू शकतात पण प्रत्यक्षात ती साखरेने भरलेली असतात. त्यात कोणतेही फायबर, जीवनसत्त्वे किंवा खनिजे नसतात.

3/7
बहुतांश बिस्किटे मैद्यापासून बनवलेली असतात. मैद्यामध्ये कोणतेही पौष्टिक मूल्य नसते. ते पचनासाठी जड असते आणि शरीरात जाऊन त्वरीत ग्लुकोजमध्ये  रूपांतरित होते, ज्यामुळे मुलांच्या पचनसंस्थेवर ताण येतो.

4/7
जरी बिस्किटे खारट किंवा साधी वाटत असली, तरी त्यांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे मुलांना तात्पुरती ऊर्जा मिळते, पण नंतर लगेच थकवा जाणवतो. तसेच, लहानपणापासूनच मधुमेहाचा धोका वाढतो.

5/7
बिस्किटांना कुरकुरीत बनवण्यासाठी आणि त्यांचा साठवणूक कालावधी वाढवण्यासाठी पाम तेल किंवा ट्रान्स फॅट्स वापरले जाते. ही चरबी लहान मुलांच्या हृदयासाठी अत्यंत हानिकारक असते.

6/7
बिस्किटांमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप जास्त असते, जे लहानपणीच लठ्ठपणाचे कारण ठरते. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.

7/7
बिस्किटांच्या अतिसेवनामुळे शरीरातील चांगले बॅक्टेरिया कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे मुले वारंवार आजारी पडू शकतात. डॉक्टरांच्या मते, बिस्किटं लहान मुलांच्या आरोग्यसाठी स्लो पॉयझन म्हणून काम करतात, त्यामुळे प्रत्येक पालकांनी मुलांना बिस्कीट खायला देण्यास टाळावे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement