हार्ट फेल्युअर अचानक होत नाही; शरीर देतं 'हे' सिक्रेट वॉर्निंग साइन, वेळीच सावध व्हा, नाहीतर...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री शांत झोप लागावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण तुमची हीच शांत झोप जर वारंवार अस्वस्थ होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात...
दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री शांत झोप लागावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण तुमची हीच शांत झोप जर वारंवार अस्वस्थ होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आजकाल हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा हृदय निकामी (Heart Failure) होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे, आपले शरीर सुरुवातीला जे छोटे-छोटे धोक्याचे इशारे (Warning Signs) देते, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
हृदयविकार हा एका रात्रीत होणारा आजार नाही. चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि डोक्यावरचा सततचा ताण (Stress) यांमुळे तो हळूहळू आपल्या शरीरात घर करतो. विशेष म्हणजे, जेव्हा आपण रात्री झोपायला जातो, तेव्हा आपलं शरीर या आजाराची लक्षणं अधिक स्पष्टपणे दाखवू लागतं.
तुमचं शरीर रात्री झोपताना हे 4 इशारे देत नाही ना?
advertisement
शांत झोपण्यासाठी उशांचा आधार घ्यावा लागतो का?
अनेकदा सरळ झोपल्यावर काही लोकांना छातीत धाप भरून येते किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे त्यांना झोपताना दोन-तीन उशा डोक्याखाली घेऊन उंच झोपावे लागते. हे साधंसुधं वाटत असलं तरी, हे फुफ्फुसात पाणी जमा (Fluid in Lungs) होण्याचे लक्षण असू शकते, जे थेट कमजोर झालेल्या हृदयाकडे संकेत देते.
advertisement
रात्री अचानक खोकल्याची उबळ येते का?
जर तुम्हाला रात्री झोपताना कोरडा खोकला येत असेल किंवा श्वास घेताना घरघर असा आवाज (Wheezing) येत असेल, तर सावध व्हा. अनेक जण याला दमा किंवा ॲलर्जी समजून दुर्लक्ष करतात, पण हे हृदयविकाराचे एक प्रमुख लक्षण असू शकते.
पाय आणि घोट्यांना सूज येते का?
दिवसभर फिरून आल्यावर किंवा रात्री झोपताना तुम्हाला पाय, घोटा किंवा तळव्यांवर सूज (Swelling in Feet or Ankles) आलेली जाणवते का? जेव्हा हृदय रक्ताभिसरणाचे काम व्यवस्थित करू शकत नाही, तेव्हा शरीरातील पाणी आणि इतर द्रव गुरुत्वाकर्षणामुळे पायांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे सूज येते.
advertisement
अचानक आणि अकारण वजन वाढतंय का?
कोणताही विशेष बदल आहारात किंवा व्यायामात न करताही तुमचे वजन अचानक वाढत असेल, विशेषतः पोट आणि पायांच्या भागात फुगवटा जाणवत असेल, तर हे धोक्याचे आहे. शरीरात अतिरिक्त पाणी साठल्यामुळे (Water Retention) असे होऊ शकते. याशिवाय, रात्री झोप न लागणे, तळमळ होणे किंवा सकाळी उठल्यावरही प्रचंड थकवा जाणवणे, ही देखील कमजोर हृदयाची लक्षणे असू शकतात.
advertisement
हृदयाला निरोगी ठेवण्याचा राजमार्ग
हा जीवघेणा आजार टाळण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही, तर जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करण्याची गरज आहे...
- वाईट सवयी सोडा : धूम्रपान आणि तंबाखू हृदयाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांना आजच रामराम करा.
- आहारात बदल : जेवणातील तेल, तूप आणि अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करा. संतुलित आणि पौष्टिक आहारावर भर द्या.
- तणावमुक्त राहा : ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा आपल्या आवडीचे छंद जोपासा. रोज 7-8 तासांची शांत झोप घ्या.
- नियमित तपासणी : जर तुम्हाला उच्च रक्तदाब (High BP) किंवा मधुमेह (Diabetes) असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे वेळेवर घ्या आणि ते नियंत्रणात ठेवा.
advertisement
तुमचे हृदय तुमच्यासाठी अहोरात्र काम करते. शरीराने दिलेले छोटे संकेत ओळखून त्याची काळजी घेणे, ही तुमची जबाबदारी आहे. वेळीच सावध राहा आणि निरोगी आयुष्य जगा!
हे ही वाचा : तुम्ही रोज 'गूळ टाकलेला चहा' पिताय? थांबा! ही सवय तुमच्यासाठी ठरू शकते विषारी, वाचा आयुर्वेदाचार्यांचा इशारा!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 7:38 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हार्ट फेल्युअर अचानक होत नाही; शरीर देतं 'हे' सिक्रेट वॉर्निंग साइन, वेळीच सावध व्हा, नाहीतर...