चॉकलेट बॉय पुष्कर जोगचा शॉकिंग अवतार, 2 मिनिटं 8 सेकंदाचा VIDEO, पाहून डोकं चक्रावेल

Last Updated:

'ह्युमन कोकेन'च्या ट्रेलरमध्ये अभिनेता पुष्कर जोगचा एक वेगळात अवतार पाहायला मिळतोय. आजपर्यंत रोमँटीक, चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर जोर क्रूर, खूनशी रुपात दिसणार आहे.

News18
News18
अभिनेता पुष्कर जोग हिंदी सिनेमात डेब्यू करतोय. त्याचा डेब्यू हा दमदार होणार आहे. 'ह्युमन कोकेन' असं सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. काही दिवसांआधी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. 'ह्युमन कोकेन'च्या ट्रेलरमध्ये अभिनेता पुष्कर जोगचा एक वेगळात अवतार पाहायला मिळतोय. आजपर्यंत रोमँटीक, चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर जोर क्रूर, खूनशी रुपात दिसणार आहे.
'ह्युमन कोकेन'च्या ट्रेलरमध्ये धक्कादायक सीन्स पाहायला मिळत आहेत.  गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून करण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये पुष्कर जोग अगदी नव्या रूपात झळकतो. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे.
advertisement
एका भयावह जाळ्यात अडकलेला कैद्याच्या भूमिकेत पुष्कर जोग दिसणार आहे.  जिथे सुटकेची किंचितही शक्यता उरलेली नाही. रोमँटिक आणि हलक्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी इशिता राज प्रथमच एका काळोख्या आणि धगधगत्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पुष्करसोबत ती देखील कैद झाली आहे.  सिद्धांत कपूर आपल्या हटके आणि धाडसी रूपात लक्ष वेधून घेतो. त्याचे रूप, त्याची उपस्थिती सर्व काही रहस्य आणि अस्वस्थता वाढवणारे आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेत दिसत आहेत. पडद्यावर त्यांची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरते.
advertisement
'ह्युमन कोकेन' ही कथा अत्यंत महागड्या, नव्या आणि मानवी मन सुन्न करणाऱ्या अमानुष प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कोकेनच्या प्रकाराभोवती फिरते. या निःसंवेदनशील सत्याच्या गर्तेत पुष्कर जोग आणि इशिता राज सापडतात आणि त्यांचा या भीषण अंधाऱ्या जगात कसा ऱ्हास होतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. निखळ वास्तवावर आधारित ही कथा अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या आणि दडवलेल्या जगाचा पर्दाफाश करणारी आहे.
advertisement
चित्रपटाबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणतात, "ह्युमन कोकेनने मला कलाकार आणि माणूस म्हणून आकार दिला आहे. माझ्या व्यक्तिरेखेची असहाय्यता, भीती आणि अंतर्गत तडफड कॅमेरा बंद झाल्यानंतरही मनात रेंगाळत राहिली. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वांत महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे."
advertisement
इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही प्रभावी ब्रिटीश कलाकारांच्या दमदार भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. हा संपूर्ण सिनेमा युनायटेड किंगडममध्ये शूट करण्यात आला आहे. हा सिनेमा नव्या वर्षात 16 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
चॉकलेट बॉय पुष्कर जोगचा शॉकिंग अवतार, 2 मिनिटं 8 सेकंदाचा VIDEO, पाहून डोकं चक्रावेल
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement