Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Called Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राजकीय, सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राजकीय, सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून पवार यांना संपर्क साधत विशेष अभिष्टचिंतन केले. राज्यात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिलेल्या या शुभेच्छांना विशेष महत्त्व असल्याचे सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी पवारांना अभिष्टचिंतन करताना त्यांच्या दीर्घ राजकीय योगदानाचा विशेष उल्लेख केला. वेळी शिंदे यांनी त्यांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य मिळावे आणि तुमचे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी पवारांविषयी आदर व्यक्त केला. यावेळी त्यांनी पवारांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे, असे शुभेच्छा देत “आपण वयाची सेंच्युरी गाठावी,” अशी मनापासूनची सदिच्छाही व्यक्त केली.
advertisement
महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात शरद पवार मागील ५० हून अधिक वर्ष कार्यरत आहेत. राज्याचे तरुण मुख्यमंत्री ते केंद्रीय संरक्षण, कृषी मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शरद पवार यांचे राजकारणाशिवाय, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान राहिले आहे. क्रीडा संघटनांमध्येही शरद पवार यांचा वावर राहिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आदी जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
advertisement
शरद पवारांचे वयाच्या ८५व्या वर्षातही कायम सक्रिय असणे हे राजकीय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाने आणि अनुभवाने अनेक पिढ्या घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी राज्यातील सर्व राजकीय पक्षांमधून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video








