पनवेलकरांनो लक्ष द्या! 'या' रस्त्यांवर 3 दिवस वाहनांना प्रवेशबंदी; प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग जाणून घ्या
Last Updated:
Panvel Traffic Change : पनवेलमध्ये येत्या काही दिवसांत तुम्ही बाहेरून येणार असाल किंवा या शहरातून बाहेर जाणार असाल तर ही बातमी आत्ताच वाचा. कारण तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागून शकते.
पनवेल : पनवेलकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत शहरात ये-जा करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. पनवेलमधील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून हे बदल कधी आणि कसे असतील याची सविस्तर माहिती जाणून घ्या
वाहतूक बदलाचे कारण काय?
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मतदान साहित्याचे संकलन, वितरण तसेच मतमोजणीसाठी पनवेलमधील व्ही. के. हायस्कूल हे मुख्य केंद्र निश्चित करण्यात आले असून यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होणार आहे.
advertisement
या दिवशी कोणते रस्ते बंद, कुठून करावा प्रवास?
निवडणूक कामकाज सुरळीत पार पडावे आणि वाहतूक कोंडी टाळता यावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी रात्री चार प्रमुख मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी दोन मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उप आयुक्त तिरुपती काकडे यांनी जारी केले आहेत.
advertisement
व्ही. के. हायस्कूल परिसरात शेकडो बसेस, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहने ये-जा करणार असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्गही निश्चित केले आहेत. अमरधामकडून येणाऱ्या वाहनांनी पनवेल कोर्ट, नवीन पनवेल सिग्नल किंवा सावरकर चौकमार्गे प्रवास करावा. वडाळे तलाव परिसरातील वाहनांसाठीही स्वतंत्र पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
advertisement
'या' वाहनांना सूट
मात्र पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, निवडणूक कर्तव्यावरील वाहने आणि अत्यावश्यक सेवांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 1:11 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पनवेलकरांनो लक्ष द्या! 'या' रस्त्यांवर 3 दिवस वाहनांना प्रवेशबंदी; प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग जाणून घ्या










