एक गैरसमज अन् रक्तरंजित थरार! पुण्यात आई-वडिलांच्या भांडणात मुलासोबतच भयानक घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. अमोल यांचे वडील त्यांच्या आईला काही कारणास्तव शिवीगाळ करत होते
पुणे : कौटुंबिक वादातून उद्भवलेला एक किरकोळ गैरसमज किती विकोपाला जाऊ शकतो, याचा प्रत्यय खेड तालुक्यातील हेद्रुज येथे आला आहे. वडिलांना शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
अमोल बबन बच्चे (वय ३३) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (२ फेब्रुवारी) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. अमोल यांचे वडील त्यांच्या आईला काही कारणास्तव शिवीगाळ करत होते. मात्र, आरोपी लहू बच्चे, पपेश बच्चे, भरत बच्चे आणि प्रदीप बच्चे यांना असा गैरसमज झाला की, अमोल यांचे वडील आपल्याला उद्देशून शिवीगाळ करत आहेत.
advertisement
गैरसमजातून रक्तरंजित राडा
याच रागातून आरोपींनी अमोल यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड काढून अमोल यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अमोल गंभीर जखमी झाले असून आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
advertisement
घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी लहू बच्चे, पपेश बच्चे, भरत बच्चे आणि प्रदीप बच्चे यांच्या विरोधात मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागातील कौटुंबिक वादातून झालेल्या या राड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 1:11 PM IST










