advertisement

पुणे हादरलं! तरुणीसाठी दोन मित्रांमध्ये वाद, चेतननं कोयता काढला अन् भरचौकात हादरवणारं पाऊल

Last Updated:

या दोघांचीही एकाच तरुणीशी मैत्री होती. मंगळवारी रात्री हे दोघे त्रिमूर्ती चौकात भेटले.

भरचौकात मित्रावर वार (AI Image)
भरचौकात मित्रावर वार (AI Image)
पुणे: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून पुन्हा एकदा रक्ताचा खेळ समोर आला आहे. किरकोळ कारणावरून तरुणांवर होणारे जीवघेणे हल्ले थांबायचे नाव घेत नाहीत. धनकवडीतील गजबजलेल्या त्रिमूर्ती चौकात मंगळवारी रात्री एका तरुणावर मित्रानेच कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ 'मैत्रिणीशी मोबाईलवर का बोलला?' या एका संशयाने मित्राने तरुणावर हल्ला केला. यावेळी रक्ताने रस्ता माखला.
मैत्रीचा 'रक्तरंजित' शेवट
आदित्य सुनील कांबळे (वय २०, रा. नऱ्हे) आणि चेतन बाजीराव चव्हाण (वय २३, रा. धनकवडी) हे दोघेही चांगले मित्र होते. या दोघांचीही एकाच तरुणीशी मैत्री होती. मंगळवारी रात्री हे दोघे त्रिमूर्ती चौकात भेटले. गप्पांच्या ओघात आदित्यने त्या तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधल्याचे चेतनला समजले. रागाच्या भरात असलेल्या चेतनने कशाचाही विचार न करता भरचौकात कोयता उपसून आदित्यवर हल्ला चढवला.
advertisement
भरचौकात रक्ताचा सडा
रात्रीची वेळ आणि लोकांची वर्दळ असतानाही आरोपी चेतनने आदित्यवर जीवघेणे वार केले. या हल्ल्यात २० वर्षांचा आदित्य गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. अवघ्या काही सेकंदात मित्राचे रूपांतर शत्रूत झाले आणि जुन्या मैत्रीचा शेवट रक्ताने झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आरोपीला बेड्या
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपी चेतन चव्हाण याला अटक केली आहे. आदित्य कांबळे याच्या फिर्यादीवरून चेतनविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी आदित्यवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात किरकोळ वादातून कोयता काढण्याच्या वाढत्या घटनांनी आता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! तरुणीसाठी दोन मित्रांमध्ये वाद, चेतननं कोयता काढला अन् भरचौकात हादरवणारं पाऊल
Next Article
advertisement
Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प
  • मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील खारगे समितीच्या अहवालातील काही मुद्दे समोर आले आहे

  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला

  • खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना 'क्लीन चिट' मिळाल्याचे जवळपास स्पष्ट

View All
advertisement