advertisement

सोयाबीन मार्केट सुसाट! 6,000 चा टप्पा ओलांडणार? व्यापाऱ्यांनी थेट सांगितलं

Last Updated:

Soybean Market Update : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलवले आहे.

Soybean Market Update
Soybean Market Update
मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलवले आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा जास्त दर सध्या खुल्या बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा थेट बाजार समित्यांकडे वाढला आहे. शनिवारी सोयाबीनला प्रतिक्विंटल ५,५०० ते ५,९०० रुपये असा दर मिळाल्याने हा दरवाढीचा कल ठळकपणे दिसून आला.
हमीभावापेक्षा जास्त दरांचा परिणाम
दर सातत्याने वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत प्रथमच सोयाबीनला एवढ्या प्रमाणात दरवाढ अनुभवायला मिळत असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. यापूर्वी हमीभावावरच अवलंबून राहावे लागत होते; मात्र सध्या खुल्या बाजारातच अधिक चांगला दर मिळत असल्याने थेट विक्रीला प्राधान्य दिले जात आहे.
advertisement
नैसर्गिक आपत्तीचा उत्पादनावर परिणाम
चालू खरीप हंगामात अतिवृष्टी, कधी दुष्काळसदृश परिस्थिती, तर काही ठिकाणी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी, जिल्ह्यातील एकूण उत्पादनात लक्षणीय घट झाली. त्यातच गेल्या वर्षभर अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे यंदा बाजारात सोयाबीनची आवक मर्यादित राहिली आहे.
advertisement
डिसेंबरपर्यंत दरांचा निराशाजनक अनुभव
डिसेंबर २०२५ पर्यंत सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नव्हता. उत्पादन कमी असूनही बाजारात भाव स्थिर होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या नाफेडमार्फत डिसेंबरपासून हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी या केंद्रांवर सोयाबीनची विक्री केली; मात्र खुल्या बाजारात अचानक दर वाढू लागल्याने परिस्थिती बदलली.
मागील १५ दिवसांत दरवाढीची लाट
मागील पंधरा दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात सातत्याने तेजी दिसून येत आहे. विशेषतः मागील चार दिवसांत तर हमीभाव ५,३२८ रुपयांपेक्षा अधिक दर बाजार समित्यांमध्ये मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडऐवजी थेट बाजार समित्यांत विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
सांगली बाजारात उच्चांकी दर
मंगळवारी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ५,५०० ते ५,९०० रुपये असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली. दरवाढीचा हा कल काही काळ टिकण्याची शक्यता असून, याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन मार्केट सुसाट! 6,000 चा टप्पा ओलांडणार? व्यापाऱ्यांनी थेट सांगितलं
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement