Shocking! Expressway वरून गाडी नेली आणि लीक झाला कपलचा Private Video; कसा काय? हायवेवर प्रवास करताना सावधान!
- Published by:Priya Lad
Last Updated:
Expressway Couple Private Video Viral : दररोज किती तरी लोक एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करतात. पण आता या एक्स्प्रेस-वेवमुळे प्रायव्हेसी धोक्यात आली आहे. एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हायवे, एक्स्प्रेस-वे इथली सुरक्षा म्हणजे सामान्यपणे अपघाताचा विषय. हायवेवरील अपघाताच्या बातम्या येतात. पण सध्या हायवेवरील सुरक्षा अपघातापर्यंत राहिली नाही तर ती प्रायव्हेट गोष्टीपर्यंत पोहोचली आहे. तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. हायवेवर आता प्रायव्हेसी धोक्यात आली आहे. हायवेवरून गाडी नेणाऱ्या एका कपलचा खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. यानंतर असे कित्येक कपलचे खासगी व्हिडीओ बनवल्याचं उघड झालं आहे.
advertisement
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेवर आणि गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 25 ऑक्टोबर रोजीची ही घटना. आझमगडहून लखनऊला जाणारं एक नवविवाहित जोडपं पूर्वांचल एक्सप्रेस वेवरील 93 व्या किलोमीटरच्या पॉइंटवरून जात होतं.
advertisement
advertisement
व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर 2 कर्मचाऱ्यांनी सुमारे 13 किलोमीटरपर्यंत दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. त्यांनी कार थांबवायला लावली. कारमधील कपलला को व्हिडिओ दाखवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याबदल्यात त्यांनी पैशांची मागणी केली. संभाषणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये कर्मचारी तरुणाला धमकावताना दिसत आहेत.
advertisement
4 दिवसांनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा पोलिसांनी कारवाई केली. तपास सुरू झाला आणि एटीएमएसचे सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष सरकार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यांनी धक्कादायक खुलासा केला. गेल्या अडीच वर्षांत असे हजारो व्हिडीओ रेकॉर्ड केले गेले पण ते व्हिडीओ कधी व्हायरल झाले नाहीत, त्यामुळे प्रकरण उघडकीस आलं नाही. यावेळी व्हिडिओ व्हायरल करण्यात काही काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची भूमिका समोर आली आहे.
advertisement
जनतेला सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून पूर्वांचल एक्सप्रेसवे बांधला. एक्सप्रेसवेवर दर 10 किलोमीटर अंतरावर स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, जे वेगाचे निरीक्षण करतात आणि आपत्कालीन परिस्थितीची तात्काळ सूचना देतात. टोलवर पोलीस, अग्निशमन विभाग आणि युपिडा वाहनंदेखील तैनात आहेत.
advertisement
advertisement
पोलिसांनी 3 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे आणि एक आरोपी फरार आहे. यामध्ये एटीएमचे सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष सरकार, कर्मचारी अभिषेक तिवारी आणि सिस्टीम इंजिनिअर प्रमोद प्रमोद पटेल यांचा समावेश आहे, ज्यांनी या जोडप्याला ब्लॅकमेल केलं होतं. व्हिडिओ व्हायरल करणारा शशांक शेखर सिंग फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे आणि नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर अधिक लक्ष ठेवण्यात आलं आहे.
advertisement
आज तकच्या रिपोर्टनुसार आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हलियापूर टोलजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. कारण गावकऱ्यांच्या म्हणणं आहे की, कॅमेऱ्यांची पोहोच खूप खोलवर आहे. ते शेतात काम करणाऱ्या महिलांनाही कैद करू शकतात. गेल्या अडीच वर्षांत किती व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले आणि व्हायरल झाले हे माहित नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)







