Kalyan Crime : जगात येण्याआधीच पोटावर लाथ मारून घेतला बाळाचा जीव, शेजाऱ्याचं क्रूर कृत्य
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या हिंसक हल्ल्यादरम्यान, आरोपींपैकी एकाने माणुसकीची सर्व सीमा ओलांडून गर्भवती महिलेच्या पोटात जोराने लाथेनं वार केला. या भीषण प्रहारामुळे तिच्या गर्भातील निष्पाप बाळाचा दुर्दैवी अंत झाला.
मुंबई : कल्याण येथून एक अत्यंत क्रूर आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. डोक्यावरील टोपीसारख्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या जोरदार भांडणामध्ये एका आरोपीने गर्भवती महिलेच्या पोटात क्रूरपणे लाथ मारली. यामुळे तिच्या पोटातील बाळाचा (गर्भस्थ अर्भकाचा) जागीच मृत्यू झाला. जगात येण्याआधीच या बाळाचा शेवट झाला आहे. ही धक्कादायक घटना कल्याणजवळील मोहने येथील लहूजीनगर मैदानात घडली.
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार, शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला, जो विकोपाला गेला. या वादातून आरोपींनी थेट पीडित महिलेच्या घरात प्रवेश केला. महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना अत्यंत अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांचा वापर करून घरातील सदस्यांना जबर मारहाण केली.
advertisement
या हिंसक हल्ल्यादरम्यान, आरोपींपैकी एकाने माणुसकीची सर्व सीमा ओलांडून गर्भवती महिलेच्या पोटात जोराने लाथेनं वार केला. या भीषण प्रहारामुळे तिच्या गर्भातील निष्पाप बाळाचा दुर्दैवी अंत झाला.
पोलिसांत गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाब शेख, अक्षर शेख, शब्बीर शेख, आणि शाहरुख शेख या चार आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित महिलेनं पोलिसांना माहिती दिली की, आरोपी तिच्यावर सतत दबाव टाकत आहेत. त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी तिला धमकावत आहेत. एवढंच नाही, तर ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी तिला ३ लाख रुपये देण्याचं आमिषदेखील दिलं आहे.
महिलेने सांगितलं की, आरोपींनी तिच्या घराबाहेर बॅट आणि काठ्या ठेवल्या आहेत आणि तिच्या पतीला आणि मुलालाही जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. पीडित कुटुंबाने खडकपाडा पोलिसांना याप्रकरणी तातडीने कारवाई करून सर्व आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Kalyan Crime : जगात येण्याआधीच पोटावर लाथ मारून घेतला बाळाचा जीव, शेजाऱ्याचं क्रूर कृत्य









