श्वान पाळणाऱ्यांची खैर नाही; पिंपरी-चिंचवड शहरात आता महापालिकेकडून कडक नियम

Last Updated:

गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव श्वानांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परंतु त्या तुलनेत महापालिकेत नोंदणी करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

परवाना घेणे बंधनकारक
परवाना घेणे बंधनकारक
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पाळीव प्राणी पाळणाऱ्या नागरिकांसाठी आता कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. शहरात श्वान (कुत्रा) आणि मांजर पाळण्यासाठी महापालिकेचा रीतसर परवाना घेणे बंधनकारक आहे. तरीही केवळ ८१७ नागरिकांनी श्वान पाळण्याचा, तर केवळ ३२ नागरिकांनी मांजर पाळण्याचा परवाना घेतला आहे. मात्र, महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या अंदाजानुसार, शहरात दहा हजारांहून अधिक नागरिकांकडे श्वान आणि मांजर आहेत. या आकडेवारीतील मोठी तफावत लक्षात घेऊन, आता विनापरवाना श्वान पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका लवकरच विशेष मोहीम राबवणार आहे.
गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव श्वानांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परंतु त्या तुलनेत महापालिकेत नोंदणी करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. शहरात गेल्या दहा वर्षांत तब्बल १ लाख ७० हजार ८४० नागरिकांना श्वानांनी चावा घेतला आहे.
मोकाट श्वानांवर नियंत्रण: महापालिकेने मोकाट श्वानांचे नियंत्रण करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ४३ हजार ६८० भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले आहे. सध्या शहरात अंदाजे एक लाख भटके श्वान असल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे मत आहे.
advertisement
ऑनलाइन सुविधा: नागरिकांना महापालिका कार्यालयात येऊन परवाना घेण्याचा त्रास होऊ नये म्हणून ४ ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाइन श्वान परवाना सुविधा उपलब्ध करण्यात आली. सुरुवातीला याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि २०२३ मध्ये ६७१ नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करून परवाना प्राप्त केला. तरीही, शहरात दहा हजारांहून अधिक पाळीव श्वान असताना फक्त ८१७ जणांकडेच वैध परवाना आहे.
advertisement
दंडात्मक कारवाई आणि नियम
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने विनापरवाना श्वान पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विनापरवाना श्वान पाळणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संदीप खोत यांनी दिली. शहरात एकूण ८४९ जणांनी (श्वान आणि मांजर मिळून) रीतसर परवाना घेतला आहे. आता विनापरवाना पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
advertisement
परवान्याचे नियम आणि नूतनीकरण: परवाना मिळाल्यापासून त्याची मुदत एक वर्षासाठी असते. मुदत संपल्यावर दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. नवीन परवाना किंवा नूतनीकरणासाठी केवळ ७५ रुपये शुल्क आकारले जाते.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी स्पष्ट केलं की, श्वान आणि मांजर पाळण्यासाठी रेबीज लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आणि बंधनकारक आहे. परवानाधारकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांमुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छतेसंदर्भात किंवा पाळीव प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यास, महापालिकेला परवाना रद्द करण्याचे अधिकार आहेत.
advertisement
पाळीव प्राण्याचा परवाना महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने काढता येतो. अर्ज करताना खालील माहिती भरावी लागते:
आवश्यक तपशील: श्वान मालकाचे नाव, पत्ता, संपर्क तपशील, पाळीव प्राण्याचे नाव, रंग, वजन, लिंग, रेबीज लसीकरणाची माहिती, तसेच पाळीव प्राण्याचे छायाचित्र.
ऑनलाइन सुविधा असल्यामुळे नागरिक घरबसल्या अर्ज करू शकतात आणि ७५ रुपये शुल्क भरून परवाना मिळवू शकतात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
श्वान पाळणाऱ्यांची खैर नाही; पिंपरी-चिंचवड शहरात आता महापालिकेकडून कडक नियम
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement