Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! चाकण ते आकुर्डी वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

Last Updated:

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून चाकण ते आकुर्डी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! चाकण ते आकुर्डी वाहतुकीत आज मोठे बदल, पर्यायी मार्ग
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! चाकण ते आकुर्डी वाहतुकीत आज मोठे बदल, पर्यायी मार्ग
पुणे : पुण्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात वाहतूक कोंडी हा मोठा आणि कायमस्वरूपी प्रश्न बनला आहे. या समस्येवर उपाययोजना व्हाव्यात, यासाठी नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. तरीसुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीतर्फे आज, 9 ऑक्टोबरला, चाकण येथून आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयाकडे पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोर्चा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आदेश जारी केले आहेत. त्यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, निगडी वाहतूक विभागांतर्गत मोर्चा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार
निगडी-प्राधिकरण परिसरातील काचघर चौक ते भेळ चौक, संभाजी चौक आणि बिजलीनगर पुलापर्यंतच्या सेवा रस्त्यावरून येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनचालकांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, बिजलीनगर पूल ते पीएमआरडीए कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना एलआयसी कॉर्नरमार्गे इच्छित स्थळी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! चाकण ते आकुर्डी वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement