Aajache Rashibhavishya: कुणावर पैशाचा पाऊस, तर कुणावर अचानक संकट, बुधवारी तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: मेष ते मीन 12 राशींसाठी आजचा बुधवार खास असणार आहे. कुणाचं वैवाहिक जीवन आनंदी असेल तर कुणाला धनलाभ होणार आहे. तुमच्या नशिबी काय? हे जाणून घेऊ.
मेष राशी- तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - पत्नी तुम्हाला आनंदी करील. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. तुमची कलात्मक आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी व्हाल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करिअरमधील प्रगतीसाठी गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
सिंह राशी -तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
advertisement
तूळ राशी - आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल - राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
धनु राशी - चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
मकर राशी - आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - आयुष्याला गृहीत धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट, कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आजचा दिवस उत्तम असा जाणार आहे. तुमचा शुभ अंक 2 आज आहे.
advertisement
मीन राशी - जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे म्हणून मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. अविवाहित मंडळी आज आनंदाची बातमी ऐकतील. तुमचा शुभ अंक आज 8 असणार आहे.
advertisement