ट्रेकिंग करणाऱ्यांना हिमवादळाने घेरलं, माऊंट एव्हरेस्टवर 1000 लोक अडकले, अनेकांना हायपोथर्मियाचा त्रास

Last Updated:

जगातील सर्वात उंच असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर सुमारे १००० लोक अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सगळे लोक माऊंट एव्हरेस्टच्या अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या तिबेटी स्लोप परिसरात होते.

News18
News18
जगातील सर्वात उंच असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर सुमारे १००० लोक अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सगळे लोक माऊंट एव्हरेस्टच्या अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या तिबेटी स्लोप परिसरात होते. माऊंट एव्हरेस्टवर हिमवादळ धडकल्याने हे सर्व लोक अडकून पडले आहेत. प्रचंड वेगात वाहणारा वारा आणि आकाशात कोसळणाऱ्या बर्फामुळे या लोकांना हालचाल करणं कठीण झालं आहे. सर्वांना आपला जीव मुठीत घेऊन अडचणींचा सामना करावा लागला आहे. यातील अनेक ट्रेकर्संना हायपोथर्मियाचा त्रास होत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
४,९०० मीटर (१६,००० फूट) पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या भागात आता बर्फ हटवण्यासाठी शेकडो स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत सुमारे ३५० लोकांना वाचवण्यात आलं आहे. त्यांना कुदांग शहराच्या छोट्याशा गावात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार बर्फवृष्टी सुरू झाली. याचा सर्वाधिक फटका तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील उताराला बसला. याठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली. हा सगळा परिसर गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे. अनेकजण या मार्गाने माऊंट एव्हरेस्टवर चढाई करत असतात.
advertisement
एका स्थानिक मार्गदर्शकाने सांगितलं की, "या वर्षीचं हवामान सामान्य नाही. ऑक्टोबरमध्ये कधीही अशा हवामानाचा सामना करावा लागत होता. पण आता अचानक हिमवादळ धडकल्याने सर्वजण अडकले आहेत."
तिबेटच्या ब्लू स्काय रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदतीसाठी फोन करण्यात आला होता. मुसळधार बर्फवृष्टीमुळे गिर्यारोहकांचे तंबू उघडून पडले असून काही गिर्यारोहकांना आधीच हायपोथर्मियाचा त्रास होत आहे. शेजारील नेपाळमध्ये देखील मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. यात किमान ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात आता माऊंट एव्हरेस्टवर हिमवादळ आल्याने जिवीतहानीचा धोका वाढला आहे.
मराठी बातम्या/देश/
ट्रेकिंग करणाऱ्यांना हिमवादळाने घेरलं, माऊंट एव्हरेस्टवर 1000 लोक अडकले, अनेकांना हायपोथर्मियाचा त्रास
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement