Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये CCTV कॅमेऱ्याची नजर, किंमत ऐकाल तर अवाक व्हाल!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या बहुतेक डब्यांमध्ये सध्या सीसीटीव्ही नाहीत. आता नव्या योजनेनुसार सर्व महिला डब्यांना प्राधान्याने सीसीटीव्ही आणि टॉक-बॅक सिस्टम बसवली जाणार आहे.
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला असून गेले काही दिवस रखडलेले हे काम आता गतिमान होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार असून त्यासाठी पुढील महिनाभरात टेंडर मागवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांची तंत्रप्रणाली ही आयपी म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल आधारित असणार आहे. तसेच उच्च गुणवत्ता आणि जास्त डेटा स्टोअरेज क्षमतेच्या एका कॅमेऱ्याची किंमत जवळपास साडेतीन लाख रुपयांपर्यंत असेल.
पश्चिम रेल्वेच्या बहुतेक डब्यांमध्ये सध्या सीसीटीव्ही नाहीत. रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 1,415 डब्यांपैकी केवळ 226 डब्यांमध्ये कॅमेरे बसवले आहेत. यामध्ये 147 महिला डबे आणि 79 सामान्य डब्यांचा समावेश आहे. म्हणजेच फक्त 33 टक्के महिला डबे आणि अवघे 8 टक्के डबेच सीसीटीव्हीच्या कक्षेत आले आहेत. आता नव्या योजनेनुसार सर्व महिला डब्यांना प्राधान्याने सीसीटीव्ही आणि टॉक-बॅक सिस्टम बसवली जाणार आहे. विशेष म्हणजे हे काम वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य असून त्यानंतर सामान्य डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवली जाईल.
advertisement
सीसीटीव्हीमुळे असा होणार फायदा
पश्चिम रेल्वेने सुरक्षित प्रवासासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे रेल्वे बोर्डाने अगदी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये देखील सीव्हीव्हीआरएस (कॅमेरा सिस्टम) बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या 231 मोटरमन केबिनपैकी केवळ 51 केबिनमध्येच ही प्रणाली बसवण्यात आली आहे. पुढील टप्प्यात सर्व मोटरमन केबिनमध्ये कॅमेरे बसवले जातील. या एका सीव्हीव्हीआरएसची किंमत 1 लाख 25 हजार रुपये असेल. या प्रणालीमुळे मोटरमनकडून होणाऱ्या चुका कमी होण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 11:05 AM IST