SMS Hospital Fire: मध्यरात्री सर्वात मोठ्या रुग्णालयातील ICU मध्ये भीषण आग, 6 रुग्णांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जयपूरच्या SMS रुग्णालयातील ट्रॉमा सेंटर आयसीयूला लागलेल्या आगीत 6 रुग्णांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी. वेदवीर सिंह, हरि मोहन, ललित यांनी शौर्य दाखवत अनेकांचे प्राण वाचवले.
जयपूर: रुग्णांचं जीव वाचवणारे रुग्णालय त्यांच्यासाठी काळ बनलं आहे. काळानं घात केला आणि 6 रुग्णांचा मोठ्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जयपूरच्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात हृदयद्रावक घटना घडली. रविवारी मध्यरात्री SMS रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमधील आयसीयू विभागात लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी पाच रुग्ण होरपळले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू विभाग काही वेळातच जळून राख झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ माजली आहे.
SMS रुग्णालयात भीषण आग
या भीषण आगीच्या दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जीवाची बाजी लावून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. कॉन्स्टेबल वेदवीर सिंह, हरि मोहन आणि ललित या जवानांनी अक्षरशः आगीच्या ज्वालांमध्ये उड्या घेऊन १० हून अधिक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षित बाहेर काढले. रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नात हे जवान स्वतः बेशुद्ध झाले. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यावर एसएमएस रुग्णालयाच्याच आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. जवानांच्या या शौर्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
advertisement
कशी लागली आग डॉक्टरांनी सांगितलं
ज्या आयसीयू विभागात ही आग लागली, तिथे एकूण ११ रुग्ण दाखल होते. आयसीयू आणि सेमी-आयसीयूमध्ये मिळून एकूण 18 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना तातडीने दुसऱ्या आयसीयू विभागात हलवण्यात आलं. एसएमएस रुग्णालय हे राजस्थानमधील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. ट्रॉमा सेंटरचे प्रमुख अनुराग धाकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.
advertisement
BREAKING: 6 patients have died in a fire at the state-run Sawai Man Singh Hospital in Jaipur, Rajasthan.
The fire started in the ICU on the second floor of the trauma centre building. At the time, there were 11 patients admitted to the ICU, and six of them — two women and four… pic.twitter.com/gluQWhjr7c
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) October 6, 2025
advertisement
6 जणांचा मृत्यू कसा झाला?
ज्या आयसीयूमध्ये आग लागली, तिथे एकूण 24 रुग्ण भरती होते, त्यापैकी बहुतांश रुग्णांना वाचवण्यात यश आलं. मात्र 6 जणांचा मृत्यू झाला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धाकड यांनी सांगितले की, ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांची प्रकृती अत्यंत नाजुक होती. त्यापैकी अधिकतर रुग्ण कोमात होते आणि त्यांना जगण्यासाठी सपोर्ट सिस्टीम गरज होती. त्यामुळे त्यांना सपोर्ट सिस्टीमसह दुसऱ्या ठिकाणी तातडीने हलवणं हा मोठा टास्क होता.
Location :
Rajasthan
First Published :
October 06, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/देश/
SMS Hospital Fire: मध्यरात्री सर्वात मोठ्या रुग्णालयातील ICU मध्ये भीषण आग, 6 रुग्णांचा मृत्यू