Nashik Crime : बिझनेसचा वाद जीवावर बेतला, आई बायकोसमोर व्यावसायिकावर चाकूने सपासप वार, भयंकर घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नाशिकच्या लासलगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत बिझनेसच्या वादातून एकाने कापड व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे
Nashik Crime News: बब्बू शेख, नाशिक (लासलगाव) : नाशिकच्या लासलगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत बिझनेसच्या वादातून एकाने कापड व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पवन जाजू असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यावसायिक भागिदारीतून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव विंचूर येथील कापड व्यवसायाचा काम करणारे व्यावसायिक पवन जाजू घरी निघाले होते.त्याच्यासोबत त्याची आई आणि पत्नी देखील होती.या दरम्यान अचानक एक हल्लेखोर आला आणि त्याने त्याच्याजवळचे चाकू काढून पवन जाजू यांच्या पोटात सपासप वार केले. या दरम्यान पवन जाजू यांना त्यांच्या आई आणि पत्नीने वाचविण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला चढविला होता.
advertisement
या हल्ल्यात पवन जाजू यांच्या पोटावर तीन वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. व्यावसायिक भागीदारीतुन त्यांचे पाटनर संतोष बोराडे यांनी हल्ला केल्याचा आरोप जाजू यांच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
October 05, 2025 11:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Crime : बिझनेसचा वाद जीवावर बेतला, आई बायकोसमोर व्यावसायिकावर चाकूने सपासप वार, भयंकर घटना