T20 World Cup मध्ये नवा ट्विस्ट! बांगलादेशचा BCCI शी पंगा, पाकिस्तानने दिली ICC ला ऑफर

Last Updated:
Pakistan Offer ICC over Bangladesh T20 World Cup 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर पेच निर्माण झाला आहे. बांगलादेशच्या वादात आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उडी घेतली असून, बांगलादेशच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली आहे.
1/7
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या तोंडावर भारत आणि शेजारील देशांच्या क्रिकेट संबंधांमध्ये सध्या मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली असून, यात आता एका तिसऱ्या देशाची एन्ट्री झाली आहे.

advertisement
2/7
गेल्या काही दिवसांपासून खेळाडूंच्या निवडीवरून आणि सुरक्षेच्या कारणावरून दोन देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये वाद रंगला आहे. या वादाची ठिणगी एका मोठ्या लीगच्या लिलावानंतर पडली असून, त्याचे पडसाद आता आगामी वर्ल्ड कपच्या आयोजनावर होताना दिसत आहेत.

3/7
यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (ICC) पेच निर्माण झाला आहे. बांगलादेशच्या वादात आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) उडी घेतली असून, बांगलादेशच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली आहे.

4/7
जर श्रीलंकेत जागा उपलब्ध नसेल, तर आम्ही हे सामने पाकिस्तानात आयोजित करू शकतो, असा प्रस्ताव त्यांनी आयसीसीसमोर ठेवला आहे. मात्र, आयसीसीने बांगलादेशची मागणी आधीच फेटाळली असून, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सामने होतील असे स्पष्ट केले आहे.

5/7
पाकिस्तानच्या या प्रस्तावावर आयसीसी सकारात्मक विचार करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. बांगलादेशने आपल्या देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. या सर्व घडामोडींमुळे क्रिकेटच्या मैदानाबाहेरील तणाव आता थेट वर्ल्ड कपच्या आयोजनावर परिणाम करताना दिसत आहे.

6/7
मुस्ताफिजूर रहमान याला आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, बीसीसीआयच्या निर्देशानुसार केकेआरने त्याला रिलीज केलं होतं. त्यानंतर बांगलादेशने आक्रमक भूमिका घेतली होती.

7/7
बांगलादेशने फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये आपले सामने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेशचे 3 सामने कोलकाता आणि 1 सामना मुंबईत होणार आहेत, परंतु सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांनी हे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे.

BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement