रामराजे नाईक निंबाळकरांची मनोमिलनासाठी टाळी,पण रणजीतसिंह निंबाळकरांचा स्पष्टच नकार,नेमकं काय बोलले?

Last Updated:

रामराजे नाईक निंबाळकरांनी विकासाचे राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल असे सूचक विधान केले होते.या विधानावर आता रणजीत नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ranjitsingh naik nimbalkar reaction on ramraje naik nimbalkar
ranjitsingh naik nimbalkar reaction on ramraje naik nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsingh Nimbalkar : सातारा: फलटण येथील राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे.मात्र मागील दोन दिवसापूर्वी दोघांच्या मनोमिलनाच्या चर्चेवर रामराजे नाईक निंबाळकरांनी विकासाचे राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल असे सूचक विधान केले होते.या विधानावर आता रणजीत नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शेतकऱ्याला नडणाऱ्या व्यक्ती सोबत दोस्ती करायची नाही,असे म्हणत त्यांनी मनोमिलनास स्पष्ट नकार दिला.
फलटण येथील एका कार्यक्रमात भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाच्या विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. शेतकऱ्याला नडणाऱ्या व्यक्ती सोबत दोस्ती करायची नाही.तुमच्या सर्वांच्या साक्षीने या तालुक्यात अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नसल्याचे रणजीत नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट सांगून टाकले आहे. त्यामुळे यापुढील काळातही माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर कायम राहणार आहे.
advertisement
रामराजे निंबाळकर काय म्हणाले होते?
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर हे मनोमिलन होणार नाही. हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्याकडे ढकलला आहे. यामुळे रणजीत नाईक निंबाळकर यावर काय बोलतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनोमिलनाबाबत वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाहीतर होणार नाही,असे सांगत दोन्ही गटाच्या पक्षप्रमुखांचीही भूमिकाही महत्वाची असल्याचे स्पष्ट केले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रामराजे नाईक निंबाळकरांची मनोमिलनासाठी टाळी,पण रणजीतसिंह निंबाळकरांचा स्पष्टच नकार,नेमकं काय बोलले?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement