Pune Indore Railway: दिवाळीआधी रेल्वेचं गिफ्ट, पुण्यातील खडकी ते इंदूर विशेष रेल्वे सुरू, पाहा वेळापत्रक अन् थांबे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Indore Railway: दिवाळीसाठी रेल्वेने खास गिफ्ट दिलं असून पुणे – इंदूर मार्गावर विशेष रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेचे वेळापत्रक आणि थांबे यांबाबत जाणून घेऊ.
पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारी संभाव्य गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर ते महाराष्ट्रातील खडकी (पुणे) दरम्यान दिवाळी विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून ही रेल्वे सुरू झाली असून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दर बुधवारी ही ट्रेन इंदूरहून तर दर गुरुवारी खडकीहून ही ट्रेन सुटेल.
कसे असेल वेळापत्रक?
इंदूर ते खडकी दिवाळी विशेष साप्ताहिक रेल्वेसेवा 1 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. ट्रेन क्र. 09324 ही दर बुधवारी सकाळी 11.15 वाजता इंदूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.10 वाजता खडकी रेल्वे स्थानकात पोहोचेल. तर खडकीहून 2 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान ही विशेष रेल्वे धावणार असून दर गुरुवारी पहाटे 5.10 वाजता खडकीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.35 वाजता इंदूरला पोहोचेल.
advertisement
थांबे कुठे?
इंदूर ते खडकी साप्ताहिक विशेष ट्रेनच्या एकूण 9 फेऱ्या होणार आहेत. या ट्रेनला दोन्ही बाजूंनी देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, गोधरा, वडोदरा, सूरत, वलसाड, वापी, वसई रोड, कल्याण आणि लोणावळा हे थांबे असतील.
कशी आहे ट्रेन?
पुणे – इंदूर ही ट्रेन एलएचबी रेकवर धावत असून यामध्ये 20 बोगी असतील. यामध्ये एक सेकंड एसी आणि 17 थर्ड एसी कोच असून 2 जनरेटर व्हॅन कोच असतील. त्यामुळे आरामदायी प्रवास होणार आहे. या ट्रेनसाठी 28 सप्टेंबरपासून बुकिंग सुरू झालं असून पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाईवरून देखील तिकीट बुक करता येईल. तसेच www.enquiry.indianrail.gov.in या रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील सविस्तर माहिती घेता येईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 03, 2025 12:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Indore Railway: दिवाळीआधी रेल्वेचं गिफ्ट, पुण्यातील खडकी ते इंदूर विशेष रेल्वे सुरू, पाहा वेळापत्रक अन् थांबे